♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

किरकटवाडी व हडपसर येथील दोन तरुण व्यापाऱ्यांवर काळाचा घाला; अरुंद रस्त्यावर घाई बेतली जीवावर

पुणे: कात्रज जवळील गुजर-निंबाळकरवाडी येथील गोशाळेतील भजन संध्येचा कार्यक्रम आटोपून परत येताना झालेल्या अपघातात सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी व हडपसर येथील दोन तरुण व्यापाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गिरिधारी डायाराम जाट (रा. किरकटवाडी ता. हवेली) व गणेश जगदीश सांखला (रा. हडपसर, पुणे) असे मृत्यू झालेल्या व्यापाऱ्यांची नावे असून इतर काही व्यक्ती जखमी असल्याचीही माहिती मिळाली आहे.

गुजर-निंबाळकरवाडी येथील रासकर पार्क जवळ असलेल्या वृंदावन गोशाळेत ‘एक शाम गोमाता के नाम’ हा भजन संध्येचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुणे व परिसरातील व्यापारी बांधव सदर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने जमले होते. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर सर्वजण परत निघाले होते.

भजन संध्येसाठी आलेल्या महिलांनी भरलेली बस अगोदर निघाली होती. त्याच दरम्यान गिरिधारी व गणेश हे दोघेजण दुचाकीवरून निघाले. अरुंद रस्ता असल्याने अगोदर बसला जाऊ द्या असे सर्वजण सांगत असताना दोघेजण बसच्या पुढे निघाले. अचानक बसचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले व गिरिधारी आणि गणेश बसखाली आल्याने दोघांचाही मृत्यू झाला. तसेच इतरही काही व्यक्ती या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातात तरुण व्यापाऱ्यांचा मृत्यू झाल्याने व्यापारी वर्गातून हळहळ व्यक्त होत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles