♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पुणे पोलिस दलात खळबळ; फरासखाना विभागाचे वरिष्ठ अधिकारी तिसऱ्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी;कारण अस्पष्ट

पुणे: पुणे पोलिस आयुक्तालयातील फरासखाना विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी कात्रज जवळील आंबेगाव परिसरातील राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून गंभीर जखमी झाले आहेत. अशोक धुमाळ असे संबंधित अधिकाऱ्याचे नाव असून मागील काही दिवसांपासून ते ताणतणावात असल्याची खात्रीलायक प्राथमिक माहिती मिळाली असून नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. गंभीर जखमी झालेल्या अशोक धुमाळ यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

अशोक धुमाळ हे पुणे पोलिस आयुक्तालयातील फरासखाना विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून सध्या कार्यरत आहेत. तांत्रिक चुकांमुळे मोक्याच्या गुन्ह्यातील आरोपी जामिनावर सुटल्याने मागील दहा ते पंधरा दिवसांपासून ते अत्यंत तणावाखाली असल्याचे व त्याबाबत ते सातत्याने बोलत असल्याचे सांगितले जात आहे .

आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अशोक धुमाळ हे राहत्या घराच्या इमारतीचे पार्कींगसह तिसऱ्या मजल्यावरून पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. घटना नेमकी कशी घडली याबाबत अधिकृत कोणतीही माहिती मिळालेली नसून संबंधित कर्मचारी व नातेवाईकांमध्ये ते अत्यंत तणावाखाली होते अशी चर्चा सुरू असल्याचे दिसून येत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles