♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Leopard Attack: सणसनगर येथे बिबट्याच्या हल्ल्यात सुमारे 100 कोंबड्यांचा मृत्यू; आतापर्यंत पाच कुत्रेही बेपत्ता; शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

सणसनगर(हवेली): येथील राजू सणस यांच्या पोल्ट्री फार्म मधील कोंबड्यांवर रात्रीच्या वेळी बिबट्याने हल्ला केला यात सुमारे 100 गावरान कोंबड्यांचा मृत्यू झाला असून संबंधित शेतकऱ्यांचे सुमारे चाळीस ते पन्नास हजार रुपये नुकसान झाले आहे. तसेच मागील काही दिवसांपासून वस्तीवरील चार ते पाच कुत्रे बेपत्ता झाले असून त्यांची सदर बिबट्याने शिकार केली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सातत्याने बिबट्या येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

राजू सणस यांच्या पोल्ट्री फार्म मधील कोंबड्यांचा रात्रीच्या वेळी मृत्यू होत होता. नेमके काय होतेय ते त्यांना कळत नव्हते. काल त्यांच्या भावाच्या घरी पूजा असल्याने सर्वजण तेथेच होते. रात्री उशिरा कोंबड्यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांनी बाहेर पाहिले असता बिबट्या जाळीवर झडप घालून जाळी तोडण्याचा प्रयत्न करत होता.
प्रत्यक्ष बिबट्या समोर दिसल्याने सणस यांच्यासह सर्वजण भितीने घराकडे पळाले मात्र दुर्दैवाने यात सुमारे 100 कोंबड्यांचा घाबरुन मृत्यू झाला आहे. सातत्याने बिबट्या येत असल्याने रहिवासी चिंतेत आहेत. वन विभागाने याबाबत दखल घ्यावी व दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी सणस यांनी केली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles