Nanded city Police station: कधी होणार नवीन गावांचा समावेश?
Nanded city Police station: कधी होणार नवीन गावांचा समावेश?
किरकटवाडी: पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत नवीन नांदेड सिटी पोलीस स्टेशन चे उद्घाटन होऊन तब्बल दोन महिने झाले तरी अद्याप खडकवासला, किरकटवाडी, नांदेड,नांदोशी व सणसनगर या गावांचा या नवीन पोलीस स्टेशन हद्दीत समावेश करण्यासाठी शासनाकडून अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. 11 ऑक्टोबर रोजी नवीन पोलीस स्टेशन चे उद्घाटन करण्यात आलेले असून अधिकारी व कर्मचारीही नियुक्त करण्यात आलेले आहेत.
सद्यस्थितीत हवेली पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या या गावांमध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने मोठमोठ्या गुन्हेगारी घटना, चोरीच्या घटना घडत असून हवेली पोलीस यांना प्रतिबंध घालण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर कार्यवाही पूर्ण करुन या गावांचा नांदेड सिटी पोलीस स्टेशन हद्दीत समावेश करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
दरम्यान निवडणूकीमुळे ही कार्यवाही रखडली होती व आता येत्या काही दिवसांत अंतिम अधिसूचना निघेल असे बोलले जात आहे.