♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

त्या बिथरलेल्या पोलीस निरीक्षकाच्या संकुचित प्रवृत्तीचे पुन्हा प्रदर्शन; सत्य पचत नसल्याने व्हॉट्स ॲप गृप मधून रिमूव्ह करण्याचं ‘अघोरी कृत्य’; कोंबडं झाकलं म्हणून सुर्य उगवायचा थांबणार का?

त्या बिथरलेल्या पोलीस निरीक्षकाच्या संकुचित प्रवृत्तीचे पुन्हा प्रदर्शन; सत्य पचत नसल्याने व्हॉट्स ॲप गृप मधून रिमूव्ह करण्याचं ‘अघोरी कृत्य’; कोंबडं झाकलं म्हणून सुर्य उगवायचा थांबणार का?

 

(निलेश बोरुडे: संपादक, द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस)

 

खडकवासला: ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या पोलिस खात्याच्या ब्रिद वाक्याला आपल्या नीच वर्तनुकिने बट्टा लावणाऱ्या आणि खाकी वर्दीला ‘कलंक’ असलेल्या त्या बिथरलेल्या पोलीस निरीक्षकाने सत्य पचवता येत नसल्याने सत्य मांडणाऱ्यांना व्हॉट्स गृप मधून रिमूव्ह करण्याचे अघोरी कृत्य सुरू केले आहे. पण कदाचित त्या भेकडाला माहित नसावं की ‘ कोंबडं झाकलं म्हणून सुर्य कधी उगवायचा थांबत नसतो!’

पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे, गुन्हेगारी कृत्ये, चोऱ्या, घरफोड्या अशा घटनांच्या सडेतोड बातम्या करुन ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने पोलीस प्रशासनाला जाब विचारला. त्यावेळी ‘हवेली पोलीस व पत्रकार संघ’ या गृपमधून हे भेकड पळालं आणि मर्जीतील लाळघोटेपणा करणारांना घेऊन दुसरा गृप तयार केला. ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने मात्र आपला लेखणीचा आवाज बुलंद ठेवत सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे विषय लावून धरले.

‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ ला डावलून नवीन गृप काढला पण असं करुन हाती केवळ ‘धुपाटणं’ राहिल्याचे शल्य सातत्याने बोचत असल्याने बिथरलेल्या पोलीस निरीक्षकाचे ‘तम्राज किल्विश’ मन त्याला खात असावे. त्यामुळे आज त्याने हवेली आपत्ती व्यवस्थापन समुह या गृपच्या ॲडमीनला सांगून अगोदर स्वतःला ॲडमिन करुन घेतले आणि मग ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ प्रतिनिधीला रिमूव्ह करुन आपली नीच मानसिकता दाखवून दिली. पदावर असलेल्या व्यक्तीचे असले बालिश वर्तन नक्कीच पोलीस खात्यासाठी शरमेची बाब आहे. लेखणीचा आवाज दाबण्याचा कितीही केविलवाणा प्रयत्न केला तरी हाती काहीही लागणार नाही. भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य इतके मजबूत आहे की असल्या कुप्रवृत्तीच्या अधीकाऱ्यांच्या मनमानी कारभाराने ते दाबले जाऊ शकत नाही.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles