♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

ब्रेक फेल झाल्याने पीएमपीएमएल बसचा अपघात; ट्रान्सफॉर्मरच्या जवळ जाऊन थांबली बस; दैव बलवत्तर म्हणून वाचले प्रवाशांचे प्राण; डीएसके विश्व-धायरी रस्त्यावरील घटना 

ब्रेक फेल झाल्याने पीएमपीएमएल बसचा अपघात; ट्रान्सफॉर्मरच्या जवळ जाऊन थांबली बस; दैव बलवत्तर म्हणून वाचले प्रवाशांचे प्राण; डीएसके विश्व-धायरी रस्त्यावरील घटना 

 

किरकटवाडी: डीएसके विश्व-धायरी रस्त्यावर पीएमपीएमएलच्या बसचा ब्रेक निकामी झाल्याने आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. रस्त्याच्या कडेने लावण्यात आलेले पत्र्याचे कंपाऊंड तोडून बस आत शिरली. धक्कादायक म्हणजे जवळच असलेल्या ट्रान्सफॉर्मर च्या अगदी जवळ जाऊन सुदैवाने बस थांबल्याने मोठी दुर्घटना टळली असून प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.

आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास डीएसके विश्व येथून बस येत होती. तीव्र उतारावर बसचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. वेगात असलेली बस रस्त्याच्या कडेला असलेले पत्र्याचे कंपाऊंड तोडून आत शिरली. धक्कादायक म्हणजे समोर महावितरणाचा ट्रान्सफॉर्मर होता. सदर ट्रान्सफॉर्मर च्या अगदी जवळ जाऊन बस थांबल्याने बसमधील सर्व प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.

‌ सकाळची वेळ असल्याने आणि रविवारची सुट्टी असल्याने तुलनेने रस्त्यावर वर्दळ कमी होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी वेळेवर दुरुस्तीचे काम न केल्याने पुण्याच्या रस्त्यांवर यमाच्या रेड्यासारख्या फिरणाऱ्या जीवघेण्या बसचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पीएमपीएमएल प्रशासनाने वेळीच गांभीर्य लक्षात घेऊन अशा नादुरुस्त अथवा खराब झालेल्या बसची वेळेत दुरुस्ती करणे आवश्यक आहे. ‘स्मार्ट सिटी’त जर अशी ‘डर्टी’ सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल तर ती शासन,प्रशासनासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles