♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Sinhagad Ghat closed: अखेर वन विभागाला जाग; दरड प्रतिबंधक काम सुरू असल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी सिंहगड घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद;The Investigation Express Impact 

सिंहगड: द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने लक्ष वेधल्यानंतर अखेर वन विभागाला जाग आली असून दरड प्रतिबंधक काम सुरू असल्याने अपघात होण्याचा संभाव्य धोका ओळखून आजपासून सिंहगड घाटरस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. 6 जूनपर्यंत घाटरस्ता वाहतूकीसाठी बंद असणार असल्याची माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. वाहतूक बंद करण्यात आल्याने दरड प्रतिबंधक कामाला वेग आला आहे.

द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर वन विभागाने सुमारे दीड कोटी रुपये निधी घाट रस्त्यावरील अतिधोकादायक दरड काढण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला होता. निधी वर्ग होऊनही काम सुरू होत नसल्याने द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस ने सार्वजनिक बांधकाम व वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधल्यानंतर अखेर काही दिवसांपूर्वी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. अत्यंत धोकादायक असलेल्या ठिकाणी पोकलेन मशिनने खोदकाम करुन दगड, मुरुम काढण्यात येत आहे. काम सुरू असताना मोठमोठे दगड खाली कोसळत आहेत. असे असताना वन विभागाने घाट रस्ता पर्यटकांसाठी खुला ठेवला होता, त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती.

काम सुरू असताना असे मोठे दगड खाली कोसळत आहेत.

द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने पुन्हा बातमीच्या माध्यमातून वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून काही दिवस घाट रस्ता बंद करण्याची मागणी केली होती. त्या बातमीची दखल वन विभागाने घेतली असून आजपासून 6 जूनपर्यंत घाटरस्ता पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. घाट रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आल्याने कामाला वेग येणार आहे.

 

वाहतूक सुरू असल्याने अपघात होण्याची शक्यता होती.

स्थानिकांची अरेरावी 

घाट रस्त्यावरुन सिंहगड परिसरातील स्थानिक ये-जा करतात. घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्याचे त्यांना सांगितल्यानंतर ते कर्मचाऱ्यांशी वाद घालतात व न जुमानता धोकादायकपणे ये-जा करतात. अशावेळी जर अपघात झाला तर जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles