♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

खडकवासला येथील आदिवासी कातकरी वस्तीवर किराणा मालाचे वाटप करुन महामानवास अभिवादन 

पुणे: खडकवासला येथील आदिवासी कातकरी वस्तीवरील सात कुटुंबांना महिभर पुरेल इतक्या किराणा मालाचे व लहान मुलांना खाऊचे वाटप करत महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. खडकवासला येथील समता तरुण मंडळ व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने या विधायक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

खडकवासला येथील समता तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी व विधायक उपक्रम राबविले जातात. एक वेगळा आदर्श समता तरुण मंडळ व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जपलेला आहे. याही वर्षी खडकवासला येथील आदिवासी कातकरी कुटुंबांना किराणा मालाचे वाटप करण्यात आले. यावेळी सचिन रणधीर, कुणाल सरवदे शुभम कांबळे आकाश कांबळे, भास्कर कांबळे, गौतम कांबळे, विश्वास रणधीर सुहास रणधीर,राजेंद्र रणधीर,शशिकांत कांबळे, सौरभ मते, अक्षय मते मयूर रणधीर, विराग रणधीर, सागर रणधीर आदी उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles