♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

खडकवासला गावच्या हद्दीत सिंहगड रस्त्याला मधोमध भेग; दुचाकी घसरून होताहेत अपघात; सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी 

पुणे: खडकवासला गावच्या हद्दीत मुकाई मंदिरासमोर सिंहगड रस्त्याला मधोमध मोठी भेग पडली असून त्यामुळे दुचाकी घसरून अपघात होत आहेत. या ठिकाणी रस्ता खचल्याने जागोजागी भेगा पडल्या असून मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने याठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

सिंहगड रस्त्याचे मुकाई मंदिरासमोरचे काम झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत या ठिकाणी रस्त्याला तडे जाऊन मोठ्या भेगा पडल्या होत्या. त्यावेळी डागडुजी करुन या भेगा बुजवून निकृष्ट काम लपविण्याचा प्रयत्न ठेकेदाराने केला त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीही दुर्लक्ष केले. त्याचा गंभीर परिणाम सध्या दिसून येत असून आता या ठिकाणी रस्ता खचला असून मधोमध खोल भेग पडली आहे. या भेगेवरुन दुचाकी गेल्यास घसरत असून त्यामुळे अपघात होत आहेत. दुचाकीस्वार घसरल्यानंतर जर बाजूने दुसरे मोठे वाहन जात असल्यास त्याखाली सापडून एखाद्याचा नाहक बळी जाऊ शकतो. त्यामुळे या ठिकाणी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

 

“करोडोंचा निधी या रस्त्याच्या कामासाठी खर्च करण्यात आला परंतु त्या दर्जाचे काम करण्यात आले नाही. रस्त्याचे काम सुरू असताना अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले त्याचा परिणाम म्हणून आज रस्त्याची ही अवस्था झाली आहे.” अक्षय मते, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष, खडकवासला.

 

“रस्त्याच्या मधोमध भेग पडल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. सर्वसामान्य नागरिकाचा येथे अपघात होऊन जायबंदी झाल्यास किंवा मृत्यू झाल्यास त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग घेणार का? प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.” कुणाल सरवदे, आरपीआय, खडकवासला विधानसभा अध्यक्ष.

 

“रस्ता खराब झाल्यानंतर त्याची डागडुजी करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने या ठिकाणी पडलेल्या भेगा बुजवून घ्याव्यात. रहदारीचा रस्ता असल्याने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.” सौरभ मते,माजी सरपंच खडकवासला.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles