♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Panshet Dam:पानशेत धरणाच्या भरावावर वाढलेल्या झाडांचा धोका;मातीचा भराव असल्याने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे 

पुणे: पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील अत्यंत महत्त्वाचे धरण असलेल्या पानशेत धरणाच्या भरावावर मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे वाढल्याने धोका निर्माण झाला आहे. पानशेत धरणाचा भराव मातीचा असल्याने या झाडांच्या मुळांमुळे भेगा पडू शकतात, त्यामुळे पाटबंधारे विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. मागील काही वर्षांपासून भरावावरील झाडांची तोड झालेली नसावी हे मोठ्या प्रमाणात वाढलेल्या झाडांवरून दिसून येत आहे.

मातीचा भराव असलेले पानशेत धरण 12 जुलै 1961 रोजी फुटून पुणे शहरात महापूर आला होता. या महाप्रलयात झालेली जीवित व वित्त हानी अद्यापही पुणेकर विसरलेले नाहीत. पाटबंधारे विभाग मात्र इतिहासातील अशा घटनांकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत असून धरणाची काळजी घेतली जात नाही.‌ अगोदरच अत्यंत तोकडं मनुष्यबळ सध्या पानशेत, वरसगाव या धरणांवर कार्यरत असून सर्व कारभार कंत्राटी सुरक्षारक्षकांच्या भरोशावर सुरू आहे. पाटबंधारे विभागातील कामगार भरतीकडे एका बाजूला शासनाचे दुर्लक्ष होत असताना दुसऱ्या बाजूला धरणांच्या सुरक्षिततेकडेही डोळेझाक केली जात आहे. पाटबंधारे विभागाने तातडीने पाहणी करुन धरणाच्या भरावावर वाढलेली झाडे तोडून घेणे अत्यंत आवश्यक आहे. याबाबत खडकवासला पाटबंधारे मंडळाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांच्याशी संपर्क साधला असता ‘येत्या मान्सून हंगामापूर्वीच्या कामांमध्ये झाडेझुडपे तोडून साफसफाई केली जाईल’ असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

खडकवासला धरणाचीही हीच परिस्थिती

खडकवासला धरणाच्या भरावावरही मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढलेली आहेत. धरणाच्या सुरक्षिततेला बाधा निर्माण करणाऱ्या अशा कामांकडे पाटबंधारे विभागाने प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles