♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Rohit Pawar:’त्यांनी’ कारवाईला घाबरुन भूमिका बदलली पण आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत, दिल्ली समोर झुकणार नाही; गोऱ्हे खुर्द येथे आ. रोहित पवारांचा नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला

पुणे: कारवाईच्या भितीने ‘त्यांनी’ आपली भूमिका बदलली पण कितीही कारवाया केल्या तरी आपण कोणत्याही परिस्थितीत आपले पुरोगामी विचार सोडणार नाहीत असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघातील सिंहगड परिसरातील गोऱ्हे खुर्द येथे आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात आमदार रोहित पवार बोलत होते.

‘माझीही चौकशी सुरू आहे, पुढेही चौकशी केली जाईल म्हणून मी घाबरलो नाही. महाराष्ट्र कधीही दिल्लीपुढे झुकलेला नाही आणि झुकणारही नाही. आपण लढणार आणि जिंकणार आहोत. शिवसेना, कॉंग्रेस आणि पवारसाहेबांच्या विचारांची तागद एकत्र झाल्याने आपला विजय निश्चित आहे. आपली एकजूट दिल्लीला दाखवून द्यायची आहे ‘ असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रेरित केले.

धमक्या दिल्या जातील

विरोधी बाजूकडून आत्ताच कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना फोन यायला लागले आहेत. पुढे आम्हीच आहोत असं म्हणून धमकावलं जात आहे. आम्ही तुमचं दवाखान्याचं हे काम केलं होतं म्हणून तुम्ही आम्हाला मदत करा असं म्हणून दबाव टाकला जाईल. पुढे अजून काय मार्ग अवलंबले जातील हे सांगता येत नाही परंतु न घाबरता आपल्याला महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा हा लढा लढायचा आहे असे रोहित पवार म्हणाले.

अनाजी पंत’ ही व्यक्ती नसून प्रवृत्ती

फार पूर्वीच्या काळापासून ‘अनाजी पंत’ या प्रवृत्तीने सामाजिक स्वास्थ्य बिघडवले आहे. सध्याही ही प्रवृत्ती काय करत आहे हे आपण सर्वजण पाहतोय असे म्हणत आमदार रोहित पवारांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला.

सोशल मिडिया चा प्रभावी वापर करा

आपला विचार,आपण करत असलेली आणि केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा असा सल्लाही यावेळी पवार यांनी दिला.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles