Transformer Burning: किरकटवाडी-नांदीशी रस्त्यावरील रोहित्राचा स्फोट होऊन आग
पुणे: किरकटवाडी-नांदोशी रस्त्याला लागून असलेल्या बापूजीबूवा नगर जवळील महावितरणच्या रोहित्राचा स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली आहे. रोहित्राच्या आजूबाजूला गवत आणि वाळलेली झुडपे असल्याने आग पसरली आहे. घटनास्थळी महावितरणचे अतिरिक्त अभियंता अविनाश कळढोणे आणि सहाय्यक अभियंता सचिन आंबवले यांच्या सूचनेनुसार कर्मचारी रवाना झाले आहेत. परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.