♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पाबे घाटातील रस्त्याची दुरवस्था; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिक-नोकरदारांचे हाल

पुणे: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे पाबे घाटातील रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्डे व अस्ताव्यस्त पडलेल्या खडीमुळे वाहने चालवताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. तसेच सातत्याने लहानमोठे अपघात होत असल्याने घाटातील रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा ते राजगड तालुक्यातील पाबे पर्यंतचे काम मागील तब्बल पाच वर्षांपासून सुरू आहे. मुख्य ठेकेदार पळून गेल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने दुसऱ्या ठेकेदाराला काम दिले तरिही अद्याप जागोजागी काम अर्धवट किंवा अपूर्ण आहे. ज्या ठिकाणी काम झालेय तेथील कामाचा दर्जाही अत्यंत निकृष्ट असल्याचे दिसत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र याकडे गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाहीत.

पाबे घाटातील रस्त्याचे काम खडीकरण करुन तसेच अर्धवट सोडण्यात आलेले असल्याने नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. खडी उघडल्याने जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच रस्त्यावर खडी पसरलेली असल्याने वाहने घसरुन अपघात होत आहेत. परिसरातील अनेक लहान मोठ्या गावांना तालुक्याशी जोडणारा हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक, नोकरदार यांची या रस्त्यावरून नेहमी ये-जा असते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी किमान यावर्षी तरी रस्त्याचे काम पूर्ण करुन नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिक करत आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles