♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पाणीपुरवठा योजनेसाठी डीपीआर ताम्रपटावर तयार केला जातोय की शिलालेख स्वरुपात बनवला जातोय ? पालिकेच्या कारभाराबाबत किरकटवाडी, खडकवासला, नांदोशी, सणसनगरचे नागरिक संतप्त

पुणे: वारेमाप करवसुली करुनही पालिकेकडून पुरेसे पाणी मिळत नसल्याने नव्याने(सुमारे तीन वर्षांपूर्वी) पालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या किरकटवाडी , खडकवासला, नांदोशी, सणसनगर या भागातील रहिवासी संताप व्यक्त करत आहेत. मुलभूत सुविधांसाठी पालिकेला कर दिलेला असताना प्रत्यक्षात मात्र नागरिकांना टॅंकरने पाणी विकत घेऊन आपली गरज भागवावी लागत असल्याने नागरिकांना नाहक आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

समाविष्ट गावांसाठी नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी सुक्ष्म नियोजन अहवाल(डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू असल्याचे उत्तर पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे. जो काळ हा अहवाल तयार करण्यासाठी लागत आहे त्यावरुन हा अहवाल ताम्रपटावर तयार करण्यात येत आहे की दगडावर कोरुन शिलालेख स्वरूपात बनवला जात आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय. पालिकेच्या या वेळकाढूपणामुळे नागरिकांचे मात्र पाण्यावाचून हाल होत आहेत. पालिकेत गेल्यानंतर परिस्थिती सुधारेल या आशेवर असलेले नागरिक सध्या हताश होऊन बसल्याचे दिसत आहेत.

 

“भरमसाठ कर घेऊन पालिका पाणी देऊ शकत नसेल तर ग्रामपंचायत बरी होती असे म्हणण्याची वेळ आली आहे. कितीही सदनिका असूद्या एकच इंच पाण्याचे कनेक्शन हा कसला न्याय?” दादासाहेब जाधव, रहिवासी सुखस्वप्न सोसायटी किरकटवाडी.

 

“गाव पालिकेत गेले तसे गावातील पाणीही गेले! मागील वीस वर्षांत अशी परिस्थिती उद्भवली नव्हती. अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात. आता बास झाले. जर परिस्थिती सुधारली नाही तर पालिकेच्या किरकटवाडी येथील कार्यालयावर मोर्चा काढून मनसे स्टाईलने उत्तर देण्यात येणार आहे.” रमेश करंजावणे, पदाधिकारी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना.

 

“पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पालिकेने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. कारणं सांगून उपयोग नाही. नागरिकांचे हाल समजून घ्यावेत.” प्रशांत हगवणे, नागरिक, किरकटवाडी.

 

“अत्यंत कमी वेळ पाणीपुरवठा होत असल्याने सध्या पाणी पुरत नाही. मार्च महिन्यात ही परिस्थिती असेल तर पुढे एप्रिल,मे महिन्यात काय अवस्था असेल याची कल्पनाही न केलेली बरी.” संदीप हगवणे, नागरिक, किरकटवाडी

 

“अगोदरच एक दिवसाआड पाणी येते तेही अपुरे व अवेळी येत असल्याने काम सोडून नागरिकांना पाण्याची वाट पाहत बसावे लागते. अधिकाऱ्यांनी गांभीर्याने विचार करुन उपाययोजना कराव्यात.” राजाराम वाटाणे, माजी सरपंच, नांदोशी-सणसनगर.

 

“कित्येक वेळा तक्रार केली परंतु काहीही कार्यवाही झालेली नाही. वर्षभर टॅंकरने पाणी विकत घेत आहोत. किमान मुलभूत सुविधा पालिका देऊ शकत नाही का?” अशोक मिश्रा, नागरिक खडकवासला.

“धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती आहे. पुणे शहराला जेथून पाणी जाते तो परिसर मात्र पाण्यासाठी वणवण करत आहे. मोठ्या सोसायट्यांना अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा फटका बसत असून लाखो रुपये पाण्यासाठी खर्च करावे लागत आहेत.” सौरभ मते, माजी सरपंच खडकवासला.

(जाहिरात सौजन्य: आर्किटेक्ट नरेंद्र हगवणे, माजी उपसरपंच किरकटवाडी)

 

“दररोज आठ ते दहा टॅंकर पाणी आम्ही विकत घेत आहोत. महिन्याला लाखो रुपये खर्च पाण्यासाठी होत आहे. टॅक्स भरुनही हा अधिकचा भुर्दंड सोसावा लागत आहे.” संतोष थोपटे, रहिवासी, मोरया स्पर्श सोसायटी.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles