♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

जाहिरातीतील मोदींची गॅरंटी आणि वास्तव परिस्थिती यांतील भीषण विरोधाभास……. The Investigation Express Women’s Day Special

पुणे: प्रत्येकाला पक्क घर, प्रत्येक घरी गॅस, प्रत्येक घरात नळाचे पाणी, ऐंशी कोटी नागरिकांना मोफत रेशन वगैरे वगैरे सांगणाऱ्या करोडो रुपये खर्चून सुरू असलेल्या जाहिराती, करोडो रुपयांचा चुराडा करुन प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मिडियातून सुरू असलेले ‘मोदींच्या गॅरंटीचे ब्रॅंडींग’ आणि प्रत्यक्षात असलेले भीषण वास्तव यांतील विरोधाभास अनुभवायचा असेल तर खुप मोठं संशोधन किवा डीप स्टडी करण्याची गरज नाही. तसेच कुठेतरी डोंगरदऱ्यात जाऊन राजकीय विरोधक म्हणून माहिती गोळा करण्याची गरज नाही. अगदी सहज, तेही पुण्यासारख्या विकसित, सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यात आणि त्यातल्या त्यात थेट पुणे महानगरपालिका हद्दीत आपण ‘मोदींची गॅरंटी’ किती फोल आहे याची अनुभूती घेऊ शकतो.

सिंहगड रस्त्यावरील खडकवासला गावच्या हद्दीत बाह्यवळण रस्त्याला लागून आदिवासी कातकरी समाजाची वस्ती आहे. वर्षानुवर्षे या कुटुंबांचे या ठिकाणी वास्तव्य आहे. मोडकळीस आलेल्या कुडाच्या झोपड्यांमध्ये वन विभागाच्या जागेत ही कुटुंबे राहत आहेत. घर म्हणावं अशी कोणतीही परिस्थिती नाही. पूर्ण संसार अस्ताव्यस्त पडलेला दिसतो. दारातून गटार वाहत आहे. अर्धनग्न लहान लेकरं आणि मुलं मुली घाणीत खेळताना दिसतात. आरोग्याबाबत कसलीही काळजी नाही कारण आरोग्य काय असतं हे समजण्यासाठी शिक्षण घेतलेलं नाही!

एक कुटुंब वगळता कोणाकडेही रेशनकार्ड नाही. अनेकांना अजून साधी ‘ओळखही’ मिळालेली नाही. अनेक वेळा याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले मात्र तात्पुरता दिखावा करण्याच्या पलीकडे प्रशासनाने काहीही केलेले नाही. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले या समाजाचे प्रश्न अद्यापही जैसे थे असून ते सुटावेत असे प्रयत्न सुरू असल्याचे सध्या तरी दिसत नाही. यांच्यासाठी काम करणारा आदिवासी विकास विभाग, महसूल विभाग, जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभाग आणि इतर सरकारी विभाग क्वचितच इकडे फिरकताना दिसतात. एका बाजूला सुरू असलेला जाहिरातींचा भडीमार, त्यातून सर्व काही अद्भुत विकास सुरू असल्याचे भासविण्याचा प्रयत्न आणि प्रत्यक्ष परिस्थिती यांचा कुठेही मेळ दिसत नाही. ही कोणतीही टीका नाही कि विरोधक म्हणून भाष्य नाही हे भयात वास्तव आहे जे कोणीही येऊन आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी पडताळून पाहू शकतं.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles