सिंहगड परिसरातील शेतकऱ्यांसाठी डोणजेच्या सरपंचांचा अनोखा उपक्रम
पुणे: सिंहगड परिसरातील शेतकऱ्यांसाठी डोणजे गावच्या सरपंच शितल भामे व ग्रामपंचायत सदस्य योगेश भामे यांनी अनोखा उपक्रम राबवला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे यांच्या वाढदिवसानिमित्त भामे यांच्याकडून मिनी ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, फवारणी पंप, खतांच्या बॅग व इतर शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांचे मोफत वाटप करण्यात आले. लाभार्थी शेतकऱ्यांनी सरपंच शितल भामे, योगेश भामे व माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे यांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली आहे.