♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

सिंहगडाच्या पश्चिमेकडील ऐतिहासिक काळुबाई मंदिराजवळील पाणवठा कोरडाठाक; वन्यजीवांची पाण्यासाठी वणवण, वन विभाग मात्र ‘उपद्रव शुल्क’ वसुलीत मग्न

पुणे: सिंहगडाच्या पश्चिमेकडील ऐतिहासिक काळुबाई मंदिराजवळील पाणवठा मागील अनेक दिवसांपासून कोरडाठाक पडलेला आहे. पाणवठ्यात पाणीच टाकण्यात येत नसल्याने परिसरातील शेकडो प्रजातीचे वन्यप्राणी, पक्षी यांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. दुसऱ्या बाजूला वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मात्र वन संवर्धन आणि संरक्षण याकडे दुर्लक्ष करून केवळ सिंहगडावर जाणाऱ्या पर्यटकांकडून ‘उपद्रव शुल्क’ वसुली आणि त्या पैशांचा ‘हिशोब जुळविण्यास’ पूर्णवेळ देत असल्याचे दिसत आहे.

सिंहगडाच्या आजूबाजूला असलेल्या घनदाट जंगलात हरिण,चितळ,भेकर, रानडुक्कर, उदमांजर, जंगली मांजर, वानर, बिबट, तरस अशा अनेक प्राण्यांसह शेकडो प्रजातीच्या दुर्मिळ पक्षांचा अधिवास आहे. मागील वर्षी वन विभागाने लाखो रुपये खर्चून या जंगली प्राण्यांसाठी सिंहगडाच्या पश्चिमेकडील ऐतिहासिक काळुबाई मंदिराजवळ पाणवठा तयार केलेला आहे. मागील वर्षी कडक उन्हाळ्यात जंगली प्राण्यांना या पाणवठ्याचा आधार झाला होता.

सद्यस्थितीत हा पाणवठा कोरडाठाक पडलेला दिसत आहे. अनेक दिवसांपासून एकही थेंब पाणी या पाणवठ्यात टाकण्यात आलेले नसल्याचे यातील पडलेला कचरा व इतर खुणांवरुन दिसत आहे. तसेच पाणी टाकण्यात येत नसल्याने उन्हामुळे पाणवठ्याला तडे जाण्यास सुरुवात झाली आहे. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी मात्र ‘जिकडे घुगऱ्या तिकडे उदे उदे ‘ या म्हणीप्रमाणे ‘उपद्रव शुल्क’ वसुलीचे काम मन लावून करत आहेत. पाणवठ्यात वेळेवर पाणी सोडणे, वनवा नियंत्रण या कामांकडे मात्र वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करत आहेत.

ऱ्हदय पिळवटून टाकणारे दृश्य 

पाणवठ्याची परिस्थिती पाहण्यासाठी गेल्यानंतर जवळच्या एका मोठ्या झाडावर बसलेल्या वानरांनी आर्त आवाजात ओरडायला सुरुवात केली. भर उन्हात पाणवठ्याकडे तोंड करुन पाण्याच्या आशेने बसलेल्या या वानरांचा आवाज ऱ्हदय पिळवटून टाकणारा होता. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ज्या ज्या ठिकाणी असे पाणवठे आहेत त्यामध्ये पाणी आहे की नाही याची सातत्याने जाऊन खात्री करुन नियमित पाणी टाकण्याची व्यवस्था करुन वन्य प्राण्यांची हेळसांड थांबविणे आवश्यक आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles