Breaking News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणावर आज निकाल
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज निकाल देणार असून विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात सायंकाळी साडेचार वाजल्यापासून निकालाचे वाचन होणार आहे. विधानसभा अध्यक्ष काय निकाल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.