‘निर्भय बनो’ सभा उधळून लावण्याचा भाजपा कार्यकर्त्यांचा डाव फसला; गाडी फोडली, हल्ला झाला तरीही ॲड.असिम सरोदे, विश्वंभर चौधरी, निखिल वागळे यांनी ‘निर्भय बनो’ सभा गाजवली
पुणे: पुण्यातील निर्भय बनो सभा उधळून लावू असा इशारा भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी जाहिरपणे दिला होता. त्या इशाऱ्यानुसार ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, ॲड असिम सरोदे व इतरांना सभेच्या ठिकाणी पोचू नयेत म्हणून त्यांची गाडी अडवून तोडफोड करण्यात आली तरीही सभा घेण्यावर ठाम असलेल्या या सर्वांनी भ्याड हल्ल्याला न जुमानता ठोकून सभा घेतली. सर्वजण सभास्थळी पोचल्यानंतर सभागृहात एकच जल्लोष झाला.
तुम्ही कितीही हल्ले करा जोपर्यंत आमचं डोकं शाबूत आहे तोपर्यंत आम्ही वैचारिक चळवळ चालूच ठेवणार असा निर्धार निखिल वागळे यांनी व्यक्त केला. तसेच पुण्यात मोकळ्या मैदानात जाहीर सभा घेणार आहोत कोण काय करतंय पाहून घेऊ असा इशाराही देण्यात आला