♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मास्टरमाईंड बहीणीने कट रचला; त्यानुसार भावाने साथीदारांच्या मदीने तब्बल सत्तेचाळीस लाखांवर डल्ला मारला; दोन महिन्यांनी मात्र……

अहमदनगर: 30 ऑक्टोबर 2023 रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर येथील ज्येष्ठ डॉक्टर प्रफुल्ल बाळकृष्ण ब्रम्हे यांच्या घरी जबरी चोरीची घटना घडली. खिडकीचे गज कापून घरात शिरलेल्या अज्ञात चोरांनी तब्बल चाळीस लाख रुपये रोख व सोन्याच्या दागिन्यांसह एकूण सत्तेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. एवढी मोठी चोरीची घटना घडल्याने श्रीरामपूर सह अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. चोरांना पकडण्यासाठी श्रीरामपूर पोलीसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू करुन पथके रवाना केली होती.

अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे हे सातत्याने तपासाचा आढावा घेत होते व सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तपास पथकांना मार्गदर्शन करत होते. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी व तपास पथकातील अधिकाऱ्यांना हा गुन्हा जाबीर रशिद शेख(वय 32, रा. रेट्टी, ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर) याने केल्याची गोपनीय माहिती मिळाली. तांत्रिक विश्लेषण करून 6 जानेवारी 2024 रोजी तपास पथकाने जाबीर याला त्याच्या गावातून ताब्यात घेतले. चौकशीतून त्याने डॉ. ब्रम्हे यांच्या घरी मोलकरीण म्हणून काम करणारी बहीण हिना राजू सय्यद (वय 38, रा. घासगल्ली, श्रीरामपूर) हिच्या सांगण्यावरुन साथीदार गौसखॉं हनीफखॉं पठाण व इरफान इब्राहिम पठाण (दोघेही रा. गराडा ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली.

आरोपींकडून सुमारे सोळा लाख रुपये रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांसह एकोणीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरीतील आणखी रोख रक्कम व मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पोलीसांचा कसून तपास सुरू आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस हवालदार शफीक शेख, मच्छिंद्र शेलार, पोलीस नाईक रघुवीर कारखेले, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, गौतम लगड, संभाजी खरात, धनंजय वाघमारे, अंबादास अधाळे, आकाश वाघमारे, अजित पटारे, ज्ञानेश्वर वाघमोडे, गणेश गावडे, सोनई पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रमिझराजा अत्तार, राहुरी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस नाईक सोनाली गलांडे, पोलीस कॉन्स्टेबल मिरा सरग,पुनम बागुल, अर्चना बर्डे,अरुणा पवार, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलीस नाईक संतोष दरेकर यांनी ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके सदर गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles