♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

श्रीरामांचा वनवास संपला,’शबरी’ मात्र अजुनही उपेक्षितच; सिंहगड परिसरातील आदिवासी कातकरी समाजाकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

पुणे: येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होत आहे. राजकीय, शासकीय व प्रशासकीय पातळीवर याबाबत वेगाने हालचाली सुरू असून हा कार्यक्रम भव्यदिव्य करण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले जात असल्याचे दिसत आहे. 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीराम मंदिरात जात आहेत मात्र आदिवासी समाजातील ज्या ‘शबरी’ची उष्टी बोरे श्रीमांनी खाऊन तिला आशीर्वाद दिले त्या शबरीच्या वंशजांचा ‘वनवास’ मात्र अद्यापही संपलेला नाही.

पुणे जिल्ह्यातील हवेली, वेल्हे, भोर, मुळशी व इतर तालुक्यांमध्ये कमीअधिक प्रमाणात आदिवासी कातकरी समाजाची वस्ती आहे. हवेली तालुक्यातील सिंहगड परिसरातील खडकवासला, एनडीए गेट, गोऱ्हे बुद्रुक, डोणजे, वरदाडे व इतर गावांमध्ये असलेला आदिवासी कातकरी समाज अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर मागील काही दिवसांपासून प्रशासनाने या बांधवांना आधारकार्ड, रेशनकार्ड व जातीचे दाखले देण्याची कार्यवाही सुरू केली मात्र त्याचा लाभ अद्याप सर्वांना मिळालेला नाही. कागदपत्रे नसल्याने हा समाज शासकीय लाभांपासून वंचित आहे. मोडक्यातोडक्या कुडाच्या झोपड्यांमध्ये असुरक्षित जीवन जगत आहे.

अशिक्षित असल्याने आपल्या हक्कांबाबत हा समाज उदासीन आहे. दुर्दैवाने शासकीय, प्रशासकीय पातळीवरूनही या समाजाच्या वाट्याला दुर्लक्षच आले आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी वरिष्ठांनी सांगितल्यानंतर दिखाव्यापुरतं काम करण्याच्या पलीकडे काहीही करत नाही. वरिष्ठ पातळीवरूनही खरंच काम झाले आहे की नाही याचा आढावा घेण्याचा कधीही प्रयत्न झालेला नाही. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाच्या राष्ट्रपती आदिवासी असताना त्याच देशातील आदिवासी समाज जर ‘ओळखीविना’ असेल तर हा खुप मोठा विरोधाभास आहे. पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यासह आदिवासी विकास विभाग व इतर संबंधितांनी या आदिवासी कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आत्मचिंतन करुन गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles