♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

सिंहगड रोड परिसरात सातत्याने चंदन तस्करी करणाऱ्या ‘पुष्पा’ला अटक; हत्यारांसह सुमारे एक लाखांचा मुद्देमाल जप्त; सिंहगड रोड पोलीसांची कारवाई 

सिंहगड रोड परिसरात सातत्याने चंदन तस्करी करणाऱ्या ‘पुष्पा’ Pushpa ला अटक; हत्यारांसह सुमारे एक लाखांचा मुद्देमाल जप्त; सिंहगड रोड पोलीसांची कारवाई 

 

पुणे: सिंहगड रोड परिसरात सातत्याने चंदन तस्करी करणाऱ्या सराईताला सिंहगड रोड पोलीसांनी अटक केली आहे. भरत शिवाजी जाधव (वय 34, रा. बोरीपारधी ता. दौंड) असे अटक करण्यात आलेल्या चंदन तस्कराचे नाव आहे. त्याच्यावर चंदन चोरीसह इतरही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रयेजा सिटी समोरील रस्त्यावर एक संशयित व्यक्ती हातात पांढरे पोते घेऊन थांबलेला असल्याची माहिती पोलीस अंमलदार शिवाजी क्षिरसागर यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून मिळाली होती. वरिष्ठांच्या आदेशानुसार त्याला पथकाने ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याजवळ असलेल्या पांढऱ्या पोत्यात कुऱ्हाड व चंदन चोरीसाठी लागणारी इतर हत्यारे आढळून आली. तसेच त्याने 16 जानेवारी 2025 रोजी धायरी येथील मानस सोसायटी परिसरातून चोरलेल्या चंदनाची सुमारे एक लाख रुपये किंमतीची लाकडं हस्तगत करण्यात आली आहेत.

पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीणकुमार पाटील, परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार, सिंहगड रोड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार संजय शिंदे, उत्तम तारु, आबा केकाण, अमोल पाटील, विनायक मोहिते, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, देवा चव्हाण , सागर शेडगे, विकास पांडुळे, विकास बांदल, स्वप्निल मगर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

आरोपी भरत जाधव याने 20 नोव्हेंबर 2020 रोजी याच चंदनाच्या झाडाचा बुंधा कापून नेला होता.

 

DIAT येथील चंदनचोरी चर्चेत!

याच आरोपी भरत शिवाजी जाधव व त्याच्या साथीदारांनी 20 नोव्हेंबर 2020 रोजी खडकवासला येथील लष्कराच्या उन्नत प्रौद्योगिकी संस्थान ( DIAT ) मधून मोठ्या चंदनाच्या झाडाची तस्करी केली होती. शस्त्रधारी सुरक्षारक्षक असताना आरोपींनी चंदनचोरी केल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. तत्कालीन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपी शोधून काढण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखा व हवेली पोलीस ठाण्याला दिल्या होत्या. 14 डिसेंबर 2020 रोजी घटनास्थळी मिळालेल्या काही पुराव्यांवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भरत शिवाजी जाधव याला अटक केली होती. दरम्यान जामीनावर सुटल्यानंतर पुन्हा आरोपी आणि त्याची टोळी चंदन तस्करी करत असल्याचे उघड झाले आहे.

 

सखोल तपास होणे गरजेचे 

आरोपी भरत जाधव हा सराईत चंदन तस्कर आहे. त्याच्या टोळीत अजून कोण आहे? त्याने अजून कोठे तस्करी केलेली आहे? तो हा माल कोणाला विकतो? याबाबत सिंहगड रोड पोलीसांनी सखोल तपास करणे आवश्यक आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles