♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

धक्कादायक……दुषित पाणीपुरवठ्यामुळे किरकटवाडीत जुलाब-उलट्यांनी नागरिक बेजार; पालिकेकडून ठोस उपाययोजना नाहीत; कर भरुनही पिण्यासाठी विकत पाणी घेण्याची वेळ; काही भागात दुषित पाण्यासोबत नळाद्वारे अळ्या येत असल्याने नागरिक संतप्त 

दुषित पाणीपुरवठ्यामुळे किरकटवाडीत जुलाब-उलट्यांनी नागरिक बेजार; पालिकेकडून ठोस उपाययोजना नाहीत; कर भरुनही पिण्यासाठी विकत पाणी घेण्याची वेळ; काही भागात दुषित पाण्यासोबत नळाद्वारे अळ्या येत असल्याने नागरिक संतप्त 

 

किरकटवाडी: सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी परिसरात मागील काही दिवसांपासून जुलाब-उलट्यांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्याबरोबरच इतर नागरिकही जुलाब-उलट्यांमुळे अक्षरशः बेजार झाले आहेत. दरम्यान पालिकेकडून होणारा दुषित पाणीपुरवठा याला जबाबदार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून शिवनगर भागात नळाद्वारे पाण्यासोबत अक्षरशः अळ्या येत असल्याने नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

किरकटवाडीतील सर्वच दवाखान्यांमध्ये दररोज गर्दी दिसत असून त्यातील बहुतांश रुग्ण हे जुलाब-उलट्यांचे असल्याचे निदर्शनास आले आहे. मागील काही दिवसांपासून किरकटवाडी येथे दुषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. पालिकेच्या संबंधित विभागाकडून मात्र याबाबत ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याने प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दररोज रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान दवाखान्यात खर्च करुन वैतागलेल्या नागरिकांना पिण्यासाठी विकत पाणी घ्यावे लागत असल्याने कर भरुनही नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.

 

पिण्यासाठी नागरिकांना अशाप्रकारे विकत पाण्याच्या बाटल्या घ्याव्या लागत आहेत.

किरकटवाडीतील दुषित पाणीपुरवठ्याची समस्या सध्या अत्यंत गंभीर बनली आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत गांभीर्याने दखल घेऊन तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन पाणी दुषित होण्यामागील कारणांचा शोध घेऊन योग्य कार्यवाही करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या आरोग्यावर या आजारांमुळे गंभीर परिणाम होत असल्याने तातडीने उपाययोजना होणे अत्यंत गरजेचे बनले आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles