खोटे कारस्थान अंगलट…. PMRDA कडून अनधिकृत काम थांबविण्याचे-अटी शर्थींचा भंग केल्याने परवानगी रद्द का करु नये? याबाबत खुलासा सादर करण्याचे आदेश
खोटे कारस्थान अंगलट…. PMRDA कडून अनधिकृत काम थांबविण्याचे-अटी शर्थींचा भंग केल्याने परवानगी रद्द का करु नये? याबाबत खुलासा सादर करण्याचे आदेश
नांदोशी-सणसनगर: हवेली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्याशी संगनमत करून बदनामी करण्यासाठी निराधार,खोटे, काल्पनिक जबाब देणे मनन आश्रम (हॅप्पी थॉट्स Happy Thoughts) या सणसनगर ता हवेली येथील संस्थेचे पदाधिकारी/कर्मचारी गणेश वसंत कडू व विशाल जगन्नाथ सकट यांच्या अंगलट आल्याने त्यांची पळता भुई थोडी झाली आहे. कारण नसताना दुसऱ्यावर शिंतोडे उडविण्याच्या नादात ‘सत्य’ उघडं पडू लागल्याने आता कसं होणार याची चिंता आडनावच कडू असलेल्या गणेश कडू आणि विशाल सकट या दोन भामट्यांना वाटू लागली आहे.
या भामट्यांना अद्दल घडविण्यासाठी सणसनगर ता हवेली येथील गट नं 23, 28 व 43 मधील बांधकामांबाबत सत्याच्या मार्गाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीए प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू करण्यात आला होता. माहिती अधिकारान्वये मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे दिसून आले की परवानग्या, सुधारित परवानग्या, पुन्हा सुधारित परवानग्या असे खेळ खेळले गेले आहेत आणि शासनाची दिशाभूल करुन लाखोंचा महसूल बुडविण्यात आलेला आहे. यात पीएमआरडीएतील काही अधिकारी यांना आर्थिक मोहापायी मदत करत असल्याचेही प्रथमदर्शनी स्पष्ट दिसून येत आहे. तसा घटनाक्रमही जुळत आहे.
धक्कादायक म्हणजे प्रत्यक्ष स्थळपाहणी न करता व भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता अव्वाच्या सव्वा बांधकाम परवानगीची खिरापत वाटण्यात आली आहे. त्याबाबत किती ‘दक्षणा’ घेण्यात आली? हे अजून समोर आलेले नाही. त्याहूनही पुढे धक्कादायक म्हणजे अगोदर अनधिकृत बांधकाम करायचे आणि पुन्हा अधिकाऱ्यांना हाताशी धरून सुधारित बांधकाम परवानगी मिळावायची या धंद्याचेही पितळ उघडे पडले आहे.
याबाबत ‘तो मी नव्हेच!’ असं ढोंग करणाऱ्या पीएमआरडीए च्या अधिकाऱ्यांकडे संविधानिक मार्गाने पाठपुरावा केल्यानंतर व सुरू असलेला गैरप्रकार दाखवून दिल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने सणसनगर ता हवेली येथील गट नं 23 मधील अनधिकृत बांधकाम थांबविण्याचे आदेश दिले असून गट नं 23, 28 व 43 पर्यंत सणसनगर येथील ग्रामीण मार्गापासून 12 मीटर रुंदीचा पोहोच पक्का रस्ता केलेला नसल्याने बांधकाम परवानगी रद्द का करु नये? असा खुलासा मागविण्यात आला आहे. तसेच इतर तक्रारीच्या अनुषंगाने प्रशासनाने दखल घेऊन कार्यवाही सुरू केली आहे.
जीवाला धोका
पीएमआरडीए कडून कारवाई सुरू झाल्याने गणेश कडू, विशाल सकट व मनन आश्रमाचे संबंधित असेले लोक बिथरले आहेत. हवेली पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे व या लोकांनी स्वतःचे काळे कारनामे झाकण्यासाठी खोटे कारस्थान रचून,खोटे जबाब घेऊन बदनामी करण्याचा कुटिल डाव आखला होता. पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी त्यांच्या चौकशीत या खोट्या जबाबांचा दाखला देत ‘आपण म्हणजे सज्जणाचा पुतळा’ असे भासविण्याचा प्रयत्न केला. खोट्यांच्या कुबड्या घेऊन त्या आधारावर पोलीस निरीक्षक सचिन वांगडे वावरत होते. आपला खरा चेहरा लपविण्यासाठी त्यांनी दुसऱ्याला बदनाम करण्याचे डाव रचले पण सत्य कधी लपत नसतं! हे ते विसरले होते. आता मात्र हे सर्वजण बिथरले आहेत. या सर्वांकडून जीवाला धोका असल्याबाबत दि. 3 सप्टेंबर 2024 रोजी, गृह विभाग, पोलीस महासंचालक, कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी या सर्वांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. पीएमआरडीएने कारवाई सुरू केल्याने या सर्वांना झटका बसला असून आता हे कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे माझ्या जिवीतास असलेला धोका अधिक वाढला आहे.