Sinhagad Road Traffic:सिंहगड रस्त्यावर डंपर बंद पडल्याने किरकटवाडी फाट्याजवळ मोठी वाहतूक कोंडी
सिंहगड रस्त्यावर डंपर बंद पडल्याने किरकटवाडी फाट्याजवळ मोठी वाहतूक कोंडी
किरकटवाडी: सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाटा येथे भर रस्त्यावर अवजड डंपर बंद पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. खडकवासला व नांदेड फाटा अशा दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मागील सुमारे दोन तासांपासून या डंपरमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झालेला आहे.