♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

आम्ही झोपायचं की नाही? किरकटवाडी-नांदोशी रस्त्यालगत राहणाऱ्या रहिवाशांचा संतप्त सवाल 

आम्ही झोपायचं की नाही? किरकटवाडी-नांदोशी रस्त्यालगत राहणाऱ्या रहिवाशांचा संतप्त सवाल

 

किरकटवाडी: पहाटे दोन तीन वाजल्यापासून जोरात अवजड वाहनांची धडधड सुरु होते. गतीरोधक बसविले परंतु त्याचा उपयोग होण्याऐवजी मनःस्ताप सहन करावा लागत असून आम्ही झोपायचे की नाही असा सवाल किरकटवाडी नांदोशी रस्त्यालगत राहणाऱ्या रहिवाशांनी उपस्थित केला असून तातडीने यावर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

काही दिवसांपूर्वी किरकटवाडी नांदोशी रस्त्यावर जागोजागी रबरी गतीरोधक बसविण्यात आले आहेत. अवजड वाहने अत्यंत वेगाने येजा करत असल्याने या गतीरोधकांमुळे अपघाताचा धोका कमी होईल असे नागरिकांना वाटत होते मात्र आता उलटा अनुभव येत आहे.

पहाटे दोन तीन वाजल्यापासून मोकळे डंपर नांदोशीकडे वेगाने जात असून डंपरचालक सदर गतीरोधकांवर वेगच कमी करत नसल्याने जोराने डंपर आदळत आहेत. त्यामुळे सातत्याने कर्कश आवाज येत असून गतीरोधकांच्या आजूबाजूला असणाऱ्या रहिवाशांना त्याचा अत्यंत मनःस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत पोलीस, मनपा प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 

“दिवसभर फौज निघाल्यासारखी डंपरची रांग असते आणि रात्री मोकळे डंपर सुसाट जात असतात. दिवसा धूळ, ट्राफीकचा त्रास आणि स्पीड ब्रेकर टाकल्यापासून पहाटेपासून धडधडीचा त्रास सुरू झाला आहे. हे स्पीड ब्रेकर म्हणजे आजारापेक्षा इलाज भयंकर झाला आहे असे वाटत आहे.” दत्ता रुपनवर, रहिवासी किरकटवाडी.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles