♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Breaking news:लोकसभा निवडणुकीत अनेकांचा बॅंड वाजविणारे ‘ते’ चिन्ह गोठविण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाचा नकार; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धक्का 

Breaking news:लोकसभा निवडणुकीत अनेकांचा बॅंड वाजविणारे ‘ते’ चिन्ह गोठविण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाचा नकार; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धक्का 

 

पुणे: लोकसभा निवडणुकीत नाम साधर्म्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला घातक ठरलेले तुतारी(ट्रंपेट) हे चिन्ह गोठविण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने नकार दिला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने हा निर्णय दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का मानला जात असून उमेदवारांची चिंता वाढली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे निवडणूक चिन्ह देण्यात आलेले आहे. लोकसभा निवडणुकीत या चिन्हावर दहा उमेदवारांनी निवडणूक लढविली व तब्बल आठ उमेदवार विजयी झाले. दहापैकी दोन उमेदवारांचा निसटता पराभव झाला. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एका चिन्हाने सर्वांचे लक्ष वेधले ते चिन्ह म्हणजे तुतारी अर्थात ट्रंपेट!

ईव्हीएम वरील तुतारी वाजवणारा माणूस आणि तुतारी ही दोन चिन्हे यांमध्ये जमीन आसमानचा फरक दिसत असला तरी नाम साधर्म्यामुळे प्रत्येक मतदारसंघात तुतारी या चिन्हाला लक्षणीय मते मिळाल्याचे दिसून आले. एका मतदारसंघात तर अनोळखी उमेदवाराला तब्बल लाखाच्या वर मते मिळाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या! एका मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झालेली मते आणि या ‘तुतारी’ ला पडलेली मते पाहिली तर पराभवाचे कारण स्पष्ट दिसून येत होते.

याचाच विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने निवडणूक आयोगाकडे मागणी केली व हे तुतारी चिन्ह गोठविण्याची मागणी केली. आज केंद्रीय निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत ही तुतारी अजून किती उमेदवारांचे बॅंड वाजविणार हे येत्या काही दिवसांत दिसणार आहे!

 

तो प्रचार घातक?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणुकीत ‘रामकृष्ण हरि वाजवा तुतारी’ असा जोरदार प्रचार करण्यात आला परंतु येथेच तर घात झाला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मतदारांपर्यंत ‘तुतारी वाजवणारा माणूस’ असा प्रचार न जाता केवळ ‘तुतारी’ हा प्रचार बिंबला गेला आणि अनेकांनी ‘तुतारी’ शब्द वाचून मतदान केले असावे असे बोलले जात आहे.

 

(वेगवान व विश्वसनीय बातम्या वाचण्यासाठी, पाहण्यासाठी The Investigation Express या YouTube चॅनल ला नक्की subscribe करा.)

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles