♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Sensitive Rescue operation: अग्निशमन दलाचे सुमारे वीस जवान…. तब्बल चार तास थरार, अखेर चिमुकल्याची सुटका! किरकटवाडी येथील घटना

अग्निशमन दलाचे सुमारे 20 जवान….तब्बल चार तास थरार…… अखेर सर्वांनी सोडला सुटकेचा निःश्वास!

निलेश बोरुडे

किरकटवाडी: येथील नांदोशी रस्त्यावर माळवाडी परिसरात असलेल्या विनायक ट्रेडर्स या किराणा मालाच्या दुकानाचे मालक प्रकाश चौधरी यांनी दोन दिवसांपूर्वी नवीन तीनचाकी टेंपो घेतला. दुकानासमोर टेंपो उभा करुन ठेवलेला होता. येणाऱ्या ग्राहकांना चौधरी हे पेढे देऊन आनंद व्यक्त करत टेंपो घेतल्याचे सांगत होते. अचानक सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास चौधरी यांच्या आनंदात दुःखाचे विरजण पडले आणि सर्वांच्या जीवाची घालमेल सुरू झाली.

प्रकाश चौधरी यांचा पाच वर्षांचा मुलगा ध्रुव टेंपोच्या मागे बसून खेळत असताना पाणी जाण्यासाठी असलेल्या होलमध्ये त्याचे बोट अडकले. अगोदर ओढून बोट काढण्याचा प्रयत्न केल्याने बोट सुजले व आणखी अवघड झाले. काय करावे कुणाला सुचत नव्हते. कटरने पत्रा कापण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु ठिणग्या उडत असल्याने मुलाला चटके लागत होते. सर्वजण हतबल होऊन बसले होते.

‘ द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ ला याबाबत माहिती मिळताच तातडीने पीएमआरडीए च्या नांदेड सिटी अग्निशमन केंद्राला माहिती देण्यात आली. मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय अग्निशमन अधिकारी सुजित पाटील व पुणे शहर अग्निशमन दलाचे केंद्र प्रमुख प्रकाश गोरे यांच्यासह जवान शुभम मिरगुंडे, मंगेश साळुंखे, नितीन पवार, भाऊसाहेब आव्हाड,चालक राठोड, पुणे शहर अग्निशमन दलाचे निलेश पोकळे, भरत गोगावले, अजित शिंदे, हर्षद कांबळे, आदित्य मोरे, पृथ्वीराज नलावडे, दिग्विजय नलावडे व इतर असे सुमारे 20 जवान व अग्निशमन दलाची तीन वाहने घटनास्थळी दाखल झाले.

वेदना होत असल्याने रडत असलेल्या चिमुकल्याला समजावत अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल चार तास प्रयत्नांची पराकाष्ठा केली. विविध उपकरणांच्या सहाय्याने जेथे बोट अडकले होते तो अंदाजे एक चौरस फुटाचा तुकडा कापून काढण्यात आला. दिवाळीचा सण सुरू असल्याने आणि त्यातच एकापाठोपाठ एक अशी तीन अग्निशमन दलाची वाहने गावात आल्याने नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. कोणतीही दुखापत होऊ नये म्हणून अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्यंत काळजीपूर्वक हे रेस्क्यु ऑपरेशन पार पाडले. पुढील उपचारांसाठी मुलाला 108 रुग्णवाहिका बोलावून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

रात्री उशिरा निघाले बोट!

रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तातडीने परिस्थिती पाहून डॉक्टरांनी औषधोपचार केले. बोटाची सुज ओसरली तर ऑपरेशन न करता बोट निघेल असे डॉक्टरांनी सांगितल्यावर वडिलांना धीर आला. अखेर रात्री उशिरा सुज ओसरली आणि सात ते आठ तास अडकलेले बोट डॉक्टरांनी काढले. अग्निशमन दलाचे व डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे कसलीही दुखापत झाली नाही.

 

बदलती सामाजिक मानसिकता आणि असंवेदनशीलतेचा कळस!

एका पाच वर्षांच्या चिमुरड्याचा वेदनेने अकांत सुरू आहे, अग्निशमन दलाचे सुमारे वीस जवान त्याला धीर देण्यासाठी आणि त्याचे अडकलेले बोट काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत हे सगळं दिसत असताना शेजारी पाजारी मात्र फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. दररोज नजरेसमोर खेळणारा चिमुकला मोठमोठ्याने रडत होता परंतु आपल्याला काय आपला सण महत्वाचा अशा मानसिकतेचे आजुबाजुचे रहिवासी फटाके वाजविण्यात मग्न होते. खेडेगाव आणि शहर यातील तफावत आणि बदललेली मानसिकता तसेच असंवेदनशीलता यातून दिसत होती.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles