♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

‘ती’ला नवीन नांदेड सिटी पोलीस स्टेशन उद्घाटनाचा मान; सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षिरसागर यांचा पुढाकार; कामकाजाला सुरुवात 

‘ती’ला नवीन नांदेड सिटी पोलीस स्टेशन उद्घाटनाचा मान; सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षिरसागर यांचा पुढाकार; कामकाजाला सुरुवात 

 

नांदेड सिटी: पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत नांदेड सिटी येथील पोलीस स्टेशनचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या हस्ते पार पडल्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजया खुटवड यांच्या हस्ते फीत कापून प्रत्यक्ष उद्घाटन करण्यात आले. सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षिरसागर यांनी मनाचा मोठेपणा दाखवत विजया खुटवड यांना हा मान दिला. यावेळी पोलीस अधिकारी व धायरी, खडकवासला, किरकटवाडी, नांदेड, नांदोशी सणसनगर या गावांतील विविध पक्षांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनोगत व्यक्त करताना सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार.

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर आज नांदेड सिटी येथे पोलीस स्टेशन सुरू झाले आहे. या पोलिस स्टेशन अंतर्गत सिंहगड रोड पोलिस ठाण्यातील धायरी व हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदेड, किरकटवाडी, खडकवासला नांदोशी-सणसनगर या गावांचा समावेश करण्यात आला आहे. सिंहगड रस्त्याला लागून असलेल्या नांदेड सिटी गेट जवळ हे नवीन पोलीस स्टेशन सुरू करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार यांनी पहिली नोंद घेऊन व परंपरेनुसार कंट्रोल रुमला कॉल देऊन प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली आहे.

नियंत्रण कक्षाला कॉल देऊन प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात करण्यात आली.

 

नागरिकांनी वाटले पेढे!

वाढती गुन्हेगारी, चोऱ्या, घरफोड्या यांना आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या हवेली पोलीस ठाण्याच्या कारभाराला वैतागलेल्या खडकवासला, किरकटवाडी येथील नागरिकांनी नवीन पोलीस स्टेशन च्या उद्घाटनानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पेढे भरवले. तसेच उपस्थित नागरिकांनीही एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांना पेढे भरवून नागरिकांनी आनंद साजरा केला.

 

द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ च्या पाठपुराव्याला यश!

नवीन नांदेड सिटी पोलीस स्टेशन लवकरात लवकर सुरू करण्यात यावे व त्यात पालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना घेण्यात यावे यासाठी ‘ द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने सातत्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता. तसेच पहिल्या अधिसूचनेत नांदेड, किरकटवाडी, खडकवासला, नांदोशी-सणसनगर या गावांचा समावेश नसल्याने त्याबाबत लक्ष वेधण्यात आले होते. त्याची तातडीने दखल घेऊन कार्यवाही करण्यात आली.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles