♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Good News:खडकवासला, किरकटवाडी, नांदेड आणि नांदोशी-सणसनगर या गावांसाठी खुशखबर!’द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने लक्ष वेधल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तातडीने घेतली दखल 

खडकवासला, किरकटवाडी, नांदेड आणि नांदोशी-सणसनगर या गावांसाठी खुशखबर!’द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने लक्ष वेधल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तातडीने घेतली दखल

 

(निलेश बोरुडे: संपादक, द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस)

किरकटवाडी: सिंहगड रस्त्यालगत असलेल्या व नव्याने पालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या किरकटवाडी, खडकवासला, नांदोशी-सणसनगर व नांदेड या गावांसाठी आणखी एक खुशखबर आहे. ‘ द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ ने लक्ष वेधल्यानंतर पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तातडीने दखल घेत कार्यवाही केली असून या चारही गावांची पूर्ण महसुली हद्द नव्याने तयार होत असलेल्या ‘नांदेड सिटी पोलीस स्टेशन’ हद्दीत समाविष्ट करण्यात येणार आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत या नवीन पोलीस स्टेशन चे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी नांदेड सिटी पोलीस स्टेशन चे नोटीफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले होते त्यात पुणे ग्रामीण हद्दीत असलेल्या या चारही गावांचा कोणताच भाग घेण्यात आला नव्हता. वास्तविक 2021 मध्ये जेव्हा नांदेड सिटी येथील जागेची पाहणी तत्कालीन पोलीस आयुक्तांनी केली होती तेव्हाच्या हद्दीच्या नकाशात या चार गावांचा समावेश होता. मागील काही दिवसांतील वाढलेल्या गुन्हेगारी घटना,चोऱ्या रोखण्यात हवेली पोलीस स्टेशन सपशेल अपयशी ठरत असल्याने या गावांची हद्द पुणे शहर पोलीस आयुक्तालयात समाविष्ट करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक सचिन दोडके, पदाधिकारी खुशाल करंजावणे, काकासाहेब चव्हाण, नरेंद्र हगवणे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदन देऊन याबाबत पाठपुरावा करण्याची मागणी केली होती.

‘ द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने या चार गावांतील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्पर पोलीस प्रशासनाची आवश्यकता याबाबत दि. 2 ऑक्टोबर रोजी बातमी प्रसिद्ध करुन पोलीस आयुक्तांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याची तातडीने दखल घेण्यात आली असून आता नांदेड, किरकटवाडी, खडकवासला व नांदोशी-सणसनगर ही पुर्ण महसुली गावे पुणे पोलीस आयुक्तालयात समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत नांदेड सिटी येथे नवीन ‘नांदेड सिटी पोलीस स्टेशन’ चे उद्घाटन करण्यात येणार आहे. सदर नवीन पोलीस स्टेशनसाठी कार्यालय तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच पुढील वर्षभरात 18 गुंठे जागेत सुसज्ज पोलीस स्टेशन इमारत बांधण्यात येणार आहे.

 

हवेली वाले सैरभैर!

दरम्यान हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘जास्त उत्पन्नाची’ महत्वाची चार गावे शहर हद्दीत जात असल्याने हवेली पोलीस ठाण्यातील वसुलीला सोकलेले सैरभैर झाले आहेत! ‘भक्ती करु का पोट भरु, सांगा मी काय करु?’ अशी अवस्था त्यांची झाली आहे. हद्दीतील गावे गेल्याच्या दु:खावर खेड शिवापूर परिसरातील हद्द हवेली पोलीस स्टेशन ला जोडण्यात येणार असल्याची चर्चा घडवून त्यांच्याकडूनच त्यांचे सांत्वन सुरू आहे! प्रत्यक्षात मात्र आता हवेली पोलीस स्टेशन ची अवस्था ‘क्षेत्र पाचशे एकर अन् उत्पन्न दोन पोते बाजरी!‘ अशी होणार असल्याने ‘त्यांच्यात’ शोक पसरला आहे. ‘साई’ ने त्यांना दुःखातून सावरण्याचे बळ द्यावे!

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles