♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

TIE Impact: अखेर सिंहगड रस्त्यावरील ‘त्या’ सरणाचा ‘अंत्यविधी’; द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने लक्ष वेधल्यानंतर पालिका प्रशासनाची तत्परतेने कारवाई; नागरिकांनी माणले आभार 

TIE Impact: अखेर सिंहगड रस्त्यावरील ‘त्या’ सरणाचा ‘अंत्यविधी’; द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने लक्ष वेधल्यानंतर पालिका प्रशासनाची तत्परतेने कारवाई; नागरिकांनी माणले आभार

द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस च्या बातमीनंतर चकाचक झालेला रस्ता

किरकटवाडी: मागील दीड ते दोन महिन्यांपासून सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाट्याजवळील cwprs कॉलनी गेट जवळ मुख्य रस्त्यावर पडलेला सरपणाचा ढीग अखेर पालिका प्रशासनाने काढून रस्त्यावरील अडथळा दूर केला आहे. ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ ने लक्ष वेधल्यानंतर सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त नामदेव बजबळकर यांनी याबाबत तातडीने कार्यवाही केली. प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर तातडीने कार्यवाही झाल्याने नागरिकांनी ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ चे आभार मानले आहेत.

दोन महिन्यांपासून हा ढीग मुख्य रस्त्यावर पडून होता.

जयप्रकाश नारायण नगर जवळील महावितरणच्या सबस्टेशन समोर मुख्य सिंहगड रस्त्यावर अज्ञाताने काटेरी फांद्यांचा मोठा ढीग आणून टाकला होता. या ठिकाणी विजेच्या खांबांमुळे अगोदरच रस्ता अरुंद आहे,त्यातच हा ढीग टाकल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण झाला होता. तसेच रात्रीच्या वेळी दुचाकी वाहनांचा अपघात होण्याची शक्यता होती. ‘ द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने‌ ” भर रस्त्यावर रचलेले हे सरण कोणाचे गडे| का त्यावरी कोणाची नजर ना पडे?” अशा उपरोधिक मथळ्याखाली याबाबत बातमी प्रसिद्ध केली.

संबंधित बातमीची सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त नामदेव बजबळकर यांनी तातडीने दखल घेतली. आरोग्य निरीक्षक मारुती हनमघर यांनी पालिकेच्या ठेकेदाराला सूचना देऊन तातडीने सदर लाकडांचा ढीग काढून घेण्यास सांगितले. त्यानुसार आज सकाळी संबंधित ठेकेदाराने ‘त्या’ सरणाचा ‘अंत्यविधी’ करुन नागरिकांची सूटका केली!

आज सकाळी पालिकेने तातडीने हा ढीग काढून रस्ता मोकळा केला.

 

(सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या बेधडकपणे मांडणाऱ्या The Investigation Express या YouTube चॅनलला जरुर subscribe करा.)

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles