♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

आमदार भिमराव तापकीर यांनी बैठक मॅनेज केल्याचा माजी नगरसेवक प्रसन्न जगताप यांचा आरोप; खडकवासला विधानसभा मतदारसंघातील गटबाजी चव्हाट्यावर

आमदार भिमराव तापकीर यांनी बैठक मॅनेज केल्याचा माजी नगरसेवक प्रसन्न जगताप यांचा आरोप; खडकवासला विधानसभा मतदारसंघातील गटबाजी चव्हाट्यावर

पुणे: भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने ठरविल्यानुसार आगामी विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवार कोण असावा यासाठी मतदारसंघ निहाय पदाधिकाऱ्यांचे गुप्त मतदान घेण्यात येत आहे. त्या अनुषंगाने काल खडकवासला विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली मात्र ही बैठक ‘मॅनेज’ करण्यात आलेली होती असा आरोप माजी नगरसेवक प्रसन्न जगताप यांनी केला आहे. दरम्यान या आरोप प्रत्यारोपांमुळे भाजपाच्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
खडकवासला विधानसभा मतदारसंघात येत्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची रिघ लागली आहे. मतदार संघातील प्रत्येक चौकात वेगळ्या इच्छुकाचा बॅनर दिसत असल्याने सध्यातरी मतदार संभ्रमात असल्याचे दिसत आहेत आणि बेभान सुटलेल्या इच्छुंना वेसन कशी घालायची असा प्रश्न सर्वच राजकीय पक्षांपुढे निर्माण झाला आहे.
इच्छुकांना रोखण्यासाठी प्रत्येक पक्ष वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविताना दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पक्षाने मतदारसंघ निहाय पदाधिकाऱ्यांचे गुप्त मतदान घेऊन उमेदवार निवडण्याचा उतारा शोधला आहे. काल खडकवासला विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचे गुप्त मतदान पार पडले परंतु त्यातून भारतीय जनता पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. माजी नगरसेवक प्रसन्न जगताप यांनी या बैठकीचा मेसेज खुप उशीरा मिळाल्याचा व आमदार भिमराव तापकीर यांनी ही बैठक मॅनेज केल्याचा जाहिर आरोप प्रसार माध्यमांतून केला आहे. तसेच उमेदवारीसाठी इच्छुक असताना जाणीवपूर्वक बोलू दिले नाही असाही आरोप प्रसन्न जगताप यांनी केला आहे.

https://www.youtube.com/@TheInvestigationExpress

 

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles