♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Corrupt Police Inspector:सर्व पुरावे उपलब्ध असताना हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांच्यावरील कारवाईस विलंब का? पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ‘काळी गुढी’ उभारणार

पुणे: हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या विरोधात तक्रार करुन दोन महिने उलटून गेले तरी अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे दि. 8 एप्रिल पासून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बसून आमरण उपोषण‌ करण्यात येणार असून विलंबाच्या निषेधार्थ काळी गुढी उभारण्यात येणार आहे.

पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी खडकवासला येथील कुप्रसिद्ध गांजा व्यापाऱ्याशी संगणमत करुन व कट रचून पत्रकार निलेश बोरुडे यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी द्यायला लावली. तसेच गांजा व्यापाऱ्याला बोलवून घेऊन खोटी तक्रार द्यायला लावली. याबाबत संबंधित गांजा व्यापाऱ्याने ज्या ठिकाणी धमकी दिली त्याच ठिकाणी तीन दिवसांनी पत्रकार बोरुडे यांची माफी मागितली व खोटी तक्रार दिल्याचे कबूल केले.

पोलीस निरीक्षक सचिन वांगडे आपल्या पदाचा गैरवापर करत असून दि.23 जानेवारी 2024 चे हवेली पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास त्यांचे कारनामे उघड होतील अशी लेखी तक्रार करुनही अद्याप काहीच कारवाई न झाल्याने पुन्हा एकदा उपोषण करण्यात येणार आहे. तसेच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर काळी गुढी’उभारुन निषेध करण्यात येणार आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles