♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

नागरिकांनी मताधिकाराचा वापर करावा; मतदार जनजागृती कार्यक्रमात सहाय्यक निवडणूक अधिकारी दादासाहेब गिते यांचे आवाहन 

पुणे: राज्यघटनेने 18 वर्षावरील भारतीय नागरिकाला लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदानाचा अधिकार दिलेला आहे. या अधिकाराचा वापर करत अधिकाधिक नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत मतदान करावे,असे आवाहन शिवाजीनगर मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब गीते यांनी केले.

पंडित नेहरू सांस्कृतिक भवन येथे मतदार जनजागृतीकरिता शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या व महिला बचत गटांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकारी रवी खंदारे, निवडणूक नायब तहसीलदार सायली धस, स्वीप समितीचे राजेंद्र मोरे, पांडुरंग महाडिक,दीपक कदम, सागर काशीद, डॉ. प्रभाकर वराडे, डॉ. नंदकुमार बोराडे,महेश मिस्त्री उपस्थित होते.

गिते यांनी भारत निवडणूक आयोगाच्या सीव्हीजील , मतदार नोंदणी करता व्होटर हेल्पलाइन, दिव्यांगांसाठी सक्षम, उमेदवारांच्या माहितीकरीत केवायसी अशा विविध मोबाईल ॲपबाबत माहिती दिली. स्वीपच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या मतदार जनजागृतीमुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी योगा प्रात्यक्षिक, पथनाट्य सादरीकरणासह ‘माझे मत माझा अधिकार’ या विषयावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी व महिला बचत गट सदस्य उपस्थित होते.

पालकसभेत मतदान जनजागृती

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाअंतर्गत रामोशीवाडी येथील अंगणवाडी क्रमांक ६ येथे पालकसभेत मतदान प्रक्रियेची माहिती देण्यात आली. यावेळी पालकांना मतदान प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करुन मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles