♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Crocodile in Khadakwasla Dam: खडकवासला धरणात पुन्हा मगरीचे दर्शन झाल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुणे: खडकवासला धरणाच्या पाण्यात खानापूर गावच्या हद्दीत पुन्हा एकदा मगर आढळून आल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन वर्षांपूर्वी खानापूर येथेच धरणाच्या किनाऱ्यावर मगरीचे पिलू आढळून आले होते. तेव्हापासून या भागात मगरीचा अधिवास असण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.

वन्यजीव बचाव पथकातील सनी निंबाळकर या तरुणाला खानापूर गावच्या हद्दीत मनेरवाडी गावच्या पाणीपुरवठा विहिरी पासून काही अंतरावर पाण्यात चार ते पाच फूट लांबीची मगर दिसून आली. याठिकाणी पाणी स्वच्छ असल्याने मगर स्पष्ट दिसत असल्याचे सनी निंबाळकर याने सांगितले. कही वेळात ही मगर पुन्हा पाण्यात गेली व दिसेनासी झाली.

खडकवासला धरणात मगर असल्याच्या चर्चा सातत्याने ऐकायला मिळतात. काही वर्षांपूर्वी खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला महाकाय मगर आढळून आली होती तसेच दोन ते तीन वर्षांपूर्वी खानापूर येथे मगरीचे पिलू आढळून आले होते. त्यावरुन या भागात मगरींचा अधिवास असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. खडकवासला धरण परिसरात मगर आढळून आल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, तसेच शेतकरी, पर्यटक यांनी काळजी घ्यावी असे आवाहन भांबुर्डा वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांनी केले आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles