♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

आदिवासी कातकरी कुटुंबातील महिलांना साडी, किराणा मालाचे वाटप; वाढदिवस आणि व्यसनमुक्ती केंद्राचा वर्धापन दिन अनोख्या पद्धतीने साजरा

पुणे: किरकटवाडी येथील आत्मनिर्भर व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक अध्यक्ष सुभाष हगवणे यांनी स्वतःचा वाढदिवस व आत्मनिर्भर व्यसनमुक्ती केंद्राचा वर्धापन दिन अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. खडकवासला व एनडीए गेट येथील आदिवासी कातकरी कुटुंबातील महिलांना साडी व गहू, तांदूळ, मुलांना खाऊ देऊन हगवणे यांनी समाजोपयोगी उपक्रम राबवून वाढदिवस व वर्धापन दिन साजरा केला.

तसेच आत्मनिर्भर व्यसनमुक्ती केंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त व्यसनमुक्ती केंद्रातून उपचार घेऊन गेलेल्यांचा संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुणे मानसशास्त्रज्ञ सारिका चांडक, महेश गायकवाड,उपसरपंच, नरेंद्र हगवणे,डॉ. रोकडे, विकास हगवणे, प्रशांत हगवणे आदी उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles