Khadakwasla Canol Tunnel update: पर्यावरण विभागाने पाटबंधारे विभागाला लावले कामाला; प्रस्तावित भूमिगत कालव्याच्या दोन्ही बाजूंची ही माहिती तातडीने सादर करण्याचे आदेश
Khadakwasla Canol Tunnel update: पर्यावरण विभागाने पाटबंधारे विभागाला लावले कामाला; प्रस्तावित भूमिगत कालव्याच्या दोन्ही बाजूंची ही माहिती तातडीने सादर करण्याचे आदेश
खडकवासला: खडकवासला धरण ते फुरसुंगी पर्यंत सुमारे 34 किलोमीटर लांबीचा कालवा भूमिगत करण्याचे काम प्रस्तावित असून मागील काही काळापासून त्याबाबत वेगाने कार्यवाही सुरू आहे. या कामात पर्यावरण विभागाने उडी घेतली असून प्रस्तावित कालव्याच्या दोन्ही बाजूंना 100 मीटर अंतरातील विहिरी, बोअरवेल,आड यांची सविस्तर माहिती तातडीने सादर करण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिले आहेत.
सदर माहिती कोणत्या कारणास्तव मागविण्यात आली आहे याबाबत पाटबंधारे विभागाला माहिती नाही मात्र विहिरी, बोअरवेल, आड यांची खोली, पाण्याचे प्रमाण, किती फुटांवर पाणी लागले अशी सविस्तर माहिती गोळा करण्यास सांगितली आहे. पाटबंधारे विभागाने तातडीने याबाबत कार्यवाही करुन प्रत्येक गटानुसार माहिती गोळा केली आहे.