Pune Ring road Project: ज्या कंपनीच्या निकृष्ट कामावर नितीन गडकरींचे आरोप त्याच कंपनीला पुणे रिंग रोडचे काम मिळाल्याने आश्चर्य; चौकशीची मागणी
पुणे:ज्या रोडवेज सोल्युशन्स इंडिया इंन्फ्रा लिमिटेड (Roadways Solutions India Infra limited) या कंपनीच्या निकृष्ट रस्ते कामाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जाहिर पत्रकार परिषदेत टिका केली होती व या कंपनीला ब्लॅकसिस्ट करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले होते त्याच रोडवेज सोल्युशन्स कंपनीला पुणे रिंग रोडचे काम देण्यात आले आहे. वाडेबोल्हाई येथे पहिल्या 25 किलोमीटर कामाच्या टप्प्याचे भूमिपूजन या कंपनीच्या संचालकांनी आज केले. याचा अर्थ सगळी सेटलमेंट आहे का? याच कंपनीने सिंहगड रस्त्याचे अत्यंत निकृष्ट काम केलेले आहे. तसेच काम अर्धवट ठेवण्यात आलेले आहे. समृद्धी महामार्गाच्या कामाबाबतही या कंपनीच्या विरोधात अनेक तक्रारी आहेत. सब कॉन्ट्रॅक्टर नेमून त्यांच्याकडून काम करुन घ्यायचे,त्यांचे पैसे बुडवायचे, कामगारांचे पैसे बुडवायचे यात या कंपनीचा हातखंडा आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, केंद्रीय रस्ते वाहतूक विभाग व पोलीस प्रशासन यांच्या खिशात आहे. याबाबत सखोल चौकशी होण्याची आवश्यकता असून अशा कंपन्यांना कामं देऊन जनतेच्या पैशांची लूट देण्याचा धंदा थांबायला हवा.