♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

भावी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांनो! लागा तयारीला; पोषक वातावरण असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता

पुणे: मागील काही वर्षांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरून न्यायालयिन प्रक्रियेत अडकलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपा महायुतीला मोठे बहुमत मिळाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा तिढा सोडविण्यासाठी हालचाली होतील असे दिसत आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला होता मात्र त्यापूर्वीच जाहीर झालेल्या 92 नगरपरिषदांच्या निवडणुकांना हा निर्णय लागू करावा असे म्हणत शिंदे सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मागील तब्बल दोन वर्षांपासून याबाबत सुप्रीम कोर्टात ‘तारिख पे तारीख’ सुरू असून दरवेळी वेगवेगळी कारणे पुढे करून सुनावणी पुढे ढकलली जात आहे.

स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी नसल्याने मनमानी पद्धतीने ‘प्रशासकराज’ सुरू आहे. स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी कोणाकडे दाद मागायची आणि कोण पाठपुरावा करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान या निवडणुका लांबणीवर पडण्याचे मुख्य कारण हे भाजपा-महायुतीला असलेली विरोधी जनभावनेची भिती हे असल्याचे बोलले जात होते. आता मात्र ‘लाडकी बहीण’ आणि इतर अनेक लोकप्रिय घोषणांमुळे विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. स्थानिक पातळीवर अत्यंत पोषक वातावरण असल्याने याचा फायदा उठविण्याचा प्रयत्न होणार हे नक्की आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही महिन्यांतच होतील असे बोलले जात आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles