♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पुणे-पानशेत रस्त्यावरील डोणजे फाटा येथे पाणी तुंबल्याने विद्यार्थी, नागरिक,पर्यटकांची गैरसोय;वळणावर डोह तयार झाल्याने अपघाताचाही धोका; सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देण्याची मागणी 

सिंहगड: पुणे-पानशेत रस्त्यावरील डोणजे फाट्याजवळ पावसाचे पाणी तुंबल्याने मोठा डोह तयार झाला आहे. वळणाच्या ठिकाणी हे पाणी साचल्याने अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन काम करून घेण्याची मागणी नागरिक करत आहेत.

डोणजे फाट्याजवळ जेथे पाणी साचले आहे तेथे बसथांबा आहे. मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असल्याने विद्यार्थी, वृद्ध, नोकरदार यांची गैरसोय होत आहे. तसेच सिंहगड परिसरात येणाऱ्या पर्यटकांनाही या पाण्यामुळे मनःस्ताप सहन करावा लागत आहे.

डोणजे येथील रहिवासी गुरुदत्त हगवणे म्हणाले की, “स्थानिक, पर्यटक सर्वांचीच गैरसोय होत आहे. या पाण्यामुळे अपघात होण्याची शक्यता असून नाहक एखाद्याचा बळी जाण्याच्या अगोदर सार्वजनिक बांधकाम विभागाने पाणी जाण्याची व्यवस्था करावी.” सध्या पाऊस सुरू असल्याने पर्यटकांची वर्दळ वाढलेली आहे. डोणजे फाटा येथे अगोदरच अरुंद रस्ता व तीव्र वळण आहे. पाणी साचल्याने रस्ता आणखी अरुंद झाला असून वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles