आषाढी एकादशी निमित्त उपवासाच्या पदार्थांचे वाटप आणि मोफत वाहतूक व्यवस्था; माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे यांच्या वतीने आयोजित उपक्रमाचे खा. सुप्रिया सुळे यांच्याकडून कौतुक
खडकवासला: माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे यांच्या वतीने प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडी येथील विठ्ठल मंदिर परिसरात हजारो भाविकांना आषाढी एकादशी निमित्त मोफत साबुदाणा खिचडी, फळे, राजगिरा लाडू व पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सदर ठिकाणी उपस्थित राहून भाविकांना आपल्या हाताने उपवासाच्या पदार्थांचे वाटप करत नवनाथ पारगे यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.
सिंहगड परिसरातील खेडेगावांतीतील भाविकांसह सिंहगड रस्त्यावरील गावांतील भाविकांना विठ्ठलवाडी येथे दर्शनासाठी जाण्यासाठी व परत येण्यासाठी मोफत रिक्षाची सोय देखील नवनाथदादा पारगे युवा मंचच्या वतीने करण्यात आली होती. परिसरातील हजारो भाविकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.
यावेळी माजी आमदार कुमार गोसावी, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती पूजा पारगे, पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम, माजी नगरसेवक काकासाहेब चव्हाण, माजी नगरसेवक सचिन दोडके, माजी नगरसेवक प्रसन्न जगताप, माजी नगरसेवक बाळाभाऊ धनकवडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन बराटे, माजी नगरसेवक विशाल तांबे, माजी नगरसेवक राहुल तुपेरे, दत्ता झिंजे, खुशाल करंजावणे, शिवसेना तालुकाप्रमुख तानाजी पवळे, खडकवासला ग्रामीण अध्यक्ष त्र्यंबक मोकाशी, युवक अध्यक्ष शरद दबडे, शिवसेनेचे संतोष शेलार, राजेश्वरी पाटील, सरपंच विलास वांजळे, सरपंच शारदा खिरीड, भक्ती कुंभार व नवनाथ पारगे युवा मंचाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामीण भागातील आजी-माजी सरपंच उपस्थित होते.