♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Crime News: मोक्क्यातील दोन वर्षांपासून फरार आरोपी अटकेत; आंबेगाव पोलीसांची कारवाई

Crime News: मोक्क्यातील दोन वर्षांपासून फरार आरोपी अटकेत; आंबेगाव पोलीसांची कारवाई

 

पुणे: मोक्याच्या गुन्ह्यात तब्बल दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला आंबेगाव पोलीसांनी अटक केली आहे. सुनील संजय गायकवाड (वय 20, रा. अटल 10, सच्चाईमाता नगर, आंबेगाव खुर्द,पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 2023 साली त्याच्यावर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र तेव्हापासून तो पोलीसांना गुंगारा देत होता.

आरोपी सुनील गायकवाड हा त्याच्या घराजवळ मित्राला भेटण्याकरीता आला असल्याचीखात्रीशीर बातमी पोलीस हवालदार चेतन गोरे यांना मिळाल्याने माहितीची शहानिशा करुन तपास पथकाने सदर ठिकाणी जावून आरोपीस ताब्यात घेतले. गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कारवाई अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर, रंजनकुमार शर्मा सह पोलीसआयुक्त, राजेश बनसोडे अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, मिलींद मोहिते पोलीस उपआयुक्त परिमंडळ-2 , राहुल आवारे सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे शरद झिने  वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गजानन चोरमले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मोहन कळमकर, पोलीस उपनिरीक्षक, तसेच पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, चेतन गोरे,हणमंत मासाळ, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे,सुभाष मोरे, हरिश गायकवाड, अजय कामठे, ज्ञानेश्वर चित्ते यांच्या पथकाने केली.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles