
Crime News: चोरीच्या दोन दुचाकींसह दोन सराईत गुन्हेगार अटकेत; नांदेड सिटी पोलीसांची कारवाई
Crime News: चोरीच्या दोन दुचाकींसह दोन सराईत गुन्हेगार अटकेत; नांदेड सिटी पोलीसांची कारवाई
पुणे: चोरीच्या दोन दुचाकींसह नांदेड सिटी पोलीसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. ओंकार संतोष सातपुते (वय 20,रा. लायगुडे वस्ती, धायरी) व साईराज अतुल तावरे (वय 18, रा. कांबळे वस्ती, गणेशनगर, धायरी) अशी अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.
वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करण्याच्या सूचना नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी गुन्हे शोध पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल यादव यांच्या पथकाला दिल्या होत्या.त्यानुसार तपास पथकातील पोलीस अंमलदार मोहन मिसाळ, शिवा क्षीरसागर यांना गोपणीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी ओकांर सातपुते व साईराज तावरे यांचेकडे चोरीच्या मोटार सायकल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे , परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम,सिंहगड रोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त, अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडसिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस निरीक्षक गुन्हे गुरुदत्त मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल यादव, पोलीस अंमलदार मोहन मिसाळ, शिवा क्षीससागर, उत्तम शिंदे, स्वप्नील मगर, निलेश कुलथे, भिमराज गागुर्डे, प्रतिक मोरे, अक्षय जाधव, संग्राम शिनगारे, सुदाम वावरे, सतिश खोत यांच्या पथकाने केली आहे.