♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

भिंत पडली, रस्ते जलमय; किरकटवाडी परिसरात मागील तीन तासांपासून पावसाचे थैमान; सिंहगड रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी 

भिंत पडली, रस्ते जलमय; किरकटवाडी परिसरात मागील तीन तासांपासून पावसाचे थैमान; सिंहगड रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी 

 

किरकटवाडी: मागील सुमारे तीन तासांपासून किरकटवाडी परिसरात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. परिसरातील अंतर्गत रस्त्यांसह मुख्य सिंहगड रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रस्त्यांना ओढ्यांचे स्वरूप आले आहे. अनेक घरे,दुकाने,जनावरांचे गोठे यांमध्ये पाणी शिरले असण्याची शक्यता असून सध्याही मुसळधार पाऊस सुरू असल्याने परिस्थितीचा नेमका अंदाज लावणे कठीण आहे.

किरकटवाडी गावठाणातील महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर जुन्या घराची भिंत कोसळल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. स्थानिक रहिवासी प्रदीप हगवणे यांनी याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांना कळविले असल्याची माहिती त्यांनी द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस शी बोलताना दिली आहे. पालिकेच्या संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

पावसाचे प्रमाण पाहता अजून मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची व आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी खबरदारी म्हणून आवश्यक यंत्रणा सतर्क ठेवण्याची आवश्यकता आहे. मुख्य सिंहगड रस्त्यावरही NWA गेट जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून वाहने बंद पडत आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles