♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

विकृत कुलकर्णीच्या कारनाम्यांनी सोसायटीही हैराण, पालिकेचाही थकवला लाखो रुपये कर;घरात उंदीर झाले म्हणत फोडतो रात्री अपरात्री सुतळी बॉंब

विकृत कुलकर्णीच्या कारनाम्यांनी सोसायटीही हैराण, पालिकेचाही थकवला लाखो रुपये कर;घरात उंदीर झाले म्हणत फोडतो रात्री अपरात्री सुतळी बॉंब

 

पुणे: शिवसृष्टीच्या प्रवेशद्वाराजवळ लघुशंका करणाऱ्या व सध्या अटकेत असलेल्या विकृत अमोल कुलकर्णीच्या कारनाम्यांनी संपूर्ण सोसायटी अक्षरशः हैराण झालेली आहे. अत्यंत उद्धट व विकृत असलेला कुलकर्णी घरात उंदीर झाले आहेत असं म्हणत चक्क सुतळी बॉंब वाजवत असल्याची माहिती रहिवाशांनी दिली आहे. तसेच त्याने पालिकेचा तब्बल 2 लाख 73 हजार रुपये कर थकवला असून सोसायटीचेही सुमारे दीड लाख रुपये थकवले आहेत.

धायरी येथील जयराज गार्डन सहकारी गृहरचना संस्थेत अमोल कुलकर्णीची सदनिका आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा शिवसृष्टी च्या प्रवेशद्वारासमोर लघुशंका करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याच्या विकृत कृत्यावर शिवप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला होता. त्याबाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आलेली आहे.

दरम्यान या अमोल कुलकर्णीच्या विकृत कारनाम्यांनी जयराज गार्डन सोयटीतील रहिवासी हैराण झालेले आहेत. धक्कादायक म्हणजे तो सोसायटीचा मेंटेनन्स देत नसून नोटीसा पाठवूनही त्याला काही फरक पडत नाही. इतकंच नाही तर त्याने पालिकेचाही लाखो रुपये कर थकविलेला आहे. सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय त्याच्या दारात कर वसूलीसाठी बॅंड वाजवत का गेले नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

घरातून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज

दरम्यान अमोल कुलकर्णीच्या घरात पाच ते सहा कुत्री असल्याचे सांगितले जात असून त्याला अटक झाल्यापासून ती उपाशी असण्याची शक्यता आहे. त्यांच्या भुंकण्याचा सारखा आवाज येत असल्याने मनसेचे शहर वाहतूकसेना अध्यक्ष शिवाजी मते यांनी सिंहगड रोड पोलिस स्टेशनला व पालिकेला त्याबाबत कळविले आहे. घर बंद असल्याने कोणालाही आत जाता येत नाही.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles