♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Sinhagad Fort: वन, पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? अतिक्रमण होत असताना झोपा काढत होते काय?

Sinhagad Fort: वन, पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? अतिक्रमण होत असताना झोपा काढत होते काय?

 

सिंहगड: मागील काही दिवसांपासून मनमानी पद्धतीने सिंहगड किल्ला बंद ठेवून वन व पुरातत्व विभागाच्या वतीने गडावरील अतिक्रमण करुन करण्यात आलेल्या बांधकामांचे तोडकाम करण्यात येत आहे. सध्या 2 जूनपर्यंत गड बंध असल्याचे जाहिर करण्यात आले आहे मात्र दुसऱ्या बाजूला हाताने तोडकाम सुरू असल्याने नेमका किती वेळ ही कारवाई पूर्ण होण्यासाठी लागेल असे सांगता येणार नसल्याचेही प्रशासनाने जाहीर केलेले असल्याने आणखी काही दिवस गड बंध राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान कच्चे,पक्के एवढेच नाही तर अगदी आरसीसी स्वरुपाचे अनधिकृत बांधकाम असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. मग इतक्या मोठ्या प्रमाणात बांधकाम होत असताना वन विभाग व पुरातत्व विभागाचे अधिकारी झोपले होते काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. धक्कादायक म्हणजे या अतिक्रमणांमध्ये काही सरकारी अतिक्रमणे सुद्धा असल्याचे समोर येत आहे. त्यासाठी शासकीय निधीही खर्च झालेला असणार हे सहाजिकच आहे. त्याची भरपाई कोण करणार?

 

कारवाईमागे नक्की काय?

या तथाकथित अतिक्रमण कारवाईबाबत स्थानाकांमध्ये मतमतांतरे दिसून येत आहेत. परस्परांचे विरोधक कुणी समर्थन तर कोणी विरोधात विचार व्यक्त करत आहेत परंतु या सगळ्यांमध्ये एक चर्चा जास्त आहे ती रोप वे बाबत! खाजगी व्यक्ती रोपवे उभारण्यासाठी सातत्याने राजकीय ताकद वापरत असून रोपवे साठी कारवाई सुरू असल्याचे बोलले जात आहे. संबंधित व्यावसायिकांना आवश्यक असलेली मोकळी जागा या कारवाईच्या माध्यमातून सरकारी खर्चाने उपलब्ध करून देण्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू असल्याचे ऐकायला मिळत आहे. यामध्ये किती तथ्य आहे ते येत्या काळात पाहायला मिळणार आहे.

 

अतिक्रमणे फक्त गडावर?

सिंहगडावरील कारवाईची सध्या चर्चा सुरू आहे मात्र अतिक्रमणे फक्त गडावरच आहेत का? वन विभागाच्या नियमांना हारताळ फासून अनेक धनदांडग्यांनी मोठमोठी बांधकामे केलेली आहेत. त्या ठिकाणी कारवाई करताना वन विभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी का हातपाय गाळतात ते समजत नाही?

 

स्थानिकांमध्ये संताप 

सिंहगडावर वर्षानुवर्षे लहानमोठा व्यवसाय करुन उदरनिर्वाह करणारे या कारवाईमुळे उघड्यावर आले आहेत. जागा ताब्यात होती परंतु कोणताही कागद यांच्याकडे नव्हता. त्याबाबत काहींनी न्यायालयात धाव घेतलेली आहे मात्र सद्यस्थितीत त्यांच्या हातात काही नसल्याने पाहण्यापलीकडे ते काहीच करु शकत नाहीत.

 

मावळ्यांचे वंशज अधांतरी आणि इतरांचे झाले सातबारे 

दरम्यान सिंहगडावर व्यवसाय करत असलेले किंवा राहत असलेले बहुतांशी मावळ्यांचे वंशज आहेत. काही किरकोळ अपवाद वगळता इतर कोणाचे सातबारे नाहीत मात्र इतर अनेकांचे सातबारे आहेत. ही बाब नक्कीच सखोल विचार करण्यासारखी आहे. पुरातत्व विभाग, महसूल विभाग व वन विभागाने याबाबत तज्ञांची समिती नेमून सत्य समोर आणणे आवश्यक आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles