♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

नांदेड सिटी वाहतूक विभागाला प्रभारी अधिकारी टिकेना! अवघ्या काही दिवसांत बदलले चार अधिकारी; वाहतुकीची समस्या गंभीर असल्याने पूर्णवेळ प्रभारी अधिकाऱ्याची गरज 

नांदेड सिटी वाहतूक विभागाला प्रभारी अधिकारी टिकेना! अवघ्या काही दिवसांत बदलले चार अधिकारी; वाहतुकीची समस्या गंभीर असल्याने पूर्णवेळ प्रभारी अधिकाऱ्याची गरज 

 

पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत अवघ्या काही महिन्यांपूर्वी अस्तित्वात आलेल्या नांदेड सिटी वाहतूक विभागाला पूर्णवेळ प्रभारी अधिकारी मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. काही दिवसांत तब्बल चार वेळा प्रभारी अधिकारी बदलले असल्याने अधिकारी टिकेनात की त्यांना लांब असल्याने यायला ‘परवडत नाही’ अशी चर्चा सध्या सुरू आहे. या भागात वाहतूक कोंडीची समस्या अत्यंत गंभीर असल्याने वाहतूक पोलीस उपायुक्त व पोलीस आयुक्तांनी तातडीने येथे पूर्णवेळ प्रभारी अधिकारी नियुक्त करणे गरजेचे आहे.

सिंहगड रस्त्यावरील धायरी, नांदेडफाटा, किरकटवाडी फाटा, कोल्हेवाडी , खडकवासला धरण चौक, खडकवासला धरण चौपाटी या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे. मागील काही दिवसांपासून खडकवासला धरण चौक व चौपाटी परिसरात तर शनिवारी आणि रविवारी भिषण परिस्थिती निर्माण होत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी पाहणी केली होती. मात्र प्रामुख्याने ज्या वाहतूक विभागावर वाहतूक नियोजनाची जबाबदारी आहे त्या वाहतूक विभागाला पूर्ण वेळ प्रभारी अधिकारी टिकत नसल्याचे दिसत आहे. त्याचा परिणाम वाहतूक नियोजनावर होत आहे.

नांदेड सिटी वाहतूक विभागाला अधिकारी न टिकण्याचे मुख्य कारण म्हणजे ‘परवडत नसल्याचे’ ऐकायला मिळत आहे. कदाचित हे कार्यक्षेत्र मुख्यालयापासून लांब असल्याने असे होतेय की काय याबाबत वरिष्ठांनी विचारविनिमय करण्याची गरज आहे. स्थानिक व पर्यटकांना किमान वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळावा म्हणून पूर्ण वेळ प्रभारी अधिकारी असणे गरजेचे आहे. त्याबाबत वरिष्ठ अधिकारी दखल घेतील अशी आशा आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles