♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

धक्कादायक… स्वतःला वाचविण्यासाठी पुणे ग्रामीण मधील हवेली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी रचलेला कट उघड; पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्याकडे पुराव्यासह तक्रार दाखल; पोलीस अधीक्षकांच्या कारवाईकडे लक्ष

धक्कादायक… स्वतःला वाचविण्यासाठी पुणे ग्रामीण मधील हवेली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी रचलेला कट उघड; पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्याकडे पुराव्यासह तक्रार दाखल; पोलीस अधीक्षकांच्या कारवाईकडे लक्ष

पुणे: स्वतः धुतल्या तांदळासारखे आहोत असं भासविण्यासाठी नामांकित संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे/कर्मचाऱ्यांचे खोटे जबाब घेऊन त्या जबाबांचा दाखला देऊन चौकशी दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या हवेली पोलीस स्टेशनच्या कटकारस्थानी आणि पदाचा दुरुपयोग करणाऱ्या पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांचा कट अखेर उघडकीस आला आहे. त्याबाबत दि. 26 मे 2025 रोजी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्याकडे पुराव्यासह तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधीक्षक काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मागील सुमारे दीड वर्षापासून पोलीस निरीक्षक सचिन वांगडे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करत होते मात्र त्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की दि 29 जानेवारी 2024 रोजी तत्कालीन पोलीस अधीक्षकांकडे हवेली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांची लेखी तक्रार करण्यात आली होती व तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. या चौकशीतून स्वतः ला वाचविण्यासाठी पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी कारस्थान रचले. चौकशीचे स्वरुप बदलावे म्हणून संबंध नसलेल्या वेगळ्या विषयांशी संदर्भ जोडले. पदाचा आणि अधिकारांचा दुरुपयोग करुन अत्यंत कुटील पद्धतीने कुंभाड रचून निर्दोष व्यक्तीचे सामाजिक व कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या काळ्या करारनाम्याचा भांडाफोड झाला आहे.
पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांची चौकशी करणाऱ्या तत्कालीन हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्याकडे जबाब देताना पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी ‘मनन आश्रण/ हॅप्पी थॉट्स ‘ च्या गणेश वसंत कडू व विशाल जगन्नाथ सकट यांच्या खोट्या जबाबांचा दाखला दिला होता. मात्र पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी त्यांच्या जबाबात जे म्हटले आहे ते आम्ही काहीही म्हटले किंवा सांगितले नसल्याचे गणेश वसंत कडू व विशाल जगन्नाथ सकट यांनी लेखी पत्राद्वारे हवेली पोलीस स्टेशनला कळविले आहे. तसेच पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांनी त्यांच्या जबाबात नमूद केलेले विधान पाहून आपल्याला धक्का बसल्याचे गणेश वसंत कडू व विशाल जगन्नाथ सकट यांनी पत्रात नमूद केले आहे.
स्वतःला चौकशीच्या फेऱ्यातून वाचविण्यासाठी व दुसऱ्याला नाहक बदनाम करण्यासाठी पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी पदाचा व अधिकारांचा गैरवापर करून नियोजित पद्धतीने हे कारस्थान रचले होते जे उघडकीस आले आहे. आतापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करुन पोलीस निरीक्षक सचिन वांगडे स्वतःला वाचवत आले. तत्कालीन हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले किंवा सध्याचे हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पुजारी, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि तत्कालीन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी याबाबत कधीही तथ्य पडताळणीची तसदी घेतली नाही. त्याचा त्रास नाहक तक्रारदाराला सहन करावा लागला व सत्य समोर आणण्यासाठी स्वतः तक्रारदाराला प्रयत्न करावे लागले. आता मात्र सत्य समोर आले आहे. कर्तव्यदक्ष व संवेदनशील अधिकारी म्हणून ख्याती असलेले पोलीस अधिक्षक संदीप सिंग गिल यांनी आता याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कारवाई करुन पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांना निलंबित करावे व सखोल विभागीय चौकशी करून अशा कुप्रवृत्तीच्या, पोलीस खात्याची मान शरमेने खाली घालायला लावणाऱ्या पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांना कायमचे सेवेतून बडतर्फ करावे.

पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्याकडून जीवाला धोका
पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी मला संपविण्यासाठी अगोदर कटकारस्थान रचले होते जे आता उघडकीस आले आहे. त्यांचे अवैध धंदेवाल्यांशी संबंध असल्याने ते माझा घातपात घडवून आणू शकतात. याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल व पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. तसेच माझ्या व माझ्या कुटुंबाला धोका पोचणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles