
Crime News:मार्बल दुकानातून तीन लाख रुपये चोरणारा अटकेत; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे नांदेड सिटी पोलीसांनी शोधला चोर
Crime News:मार्बल दुकानातून तीन लाख रुपये चोरणारा अटकेत; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे नांदेड सिटी पोलीसांनी शोधला चोर
पुणे:मायरा ग्रेनाईट्स ॲंड मार्बल्स या दुकानातून तीन लाख रुपये चोरणाऱ्यास सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या पथकाने अटक केली आहे. राहुल तुकाराम वाशिवले (वय 37, रा. वैष्णवी कॉम्प्लेक्स, वंडर सिटी जवळ,कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून चोरीतील 1 लाख 58 हजार रुपये रक्कम पोलीसांनी हस्तगत केली आहे.
दि. 17 मे रोजी राहुल वाशिवले हा मार्फल खरेदीच्या बहाण्याने दुकानात आला. त्याचेही अगोदर नऱ्हे परिसरात मार्बलचे दुकान होते त्यामुळे त्याला सर्व माहिती होती. दुकानात आल्यानंतर मालकाची नजर चुकवून त्याने काऊंटरमधील तील लाख रुपये लंपास केले. सदर बाब लक्षात आल्यानंतर दुकानाचे मालक भगवान जगदीश पारीख यांनी नांदेड सिटी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली होती. पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी तातडीने याबाबत तपास करण्याच्या सूचना तपास पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे राहुल वाशिवले यास अटक करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, झोन तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गुरुदत्त मोरे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुनगे, पोलीस अंमलदार स्वप्नील मगर, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे, शिवा क्षिरसागर, किशोर शिंदे, राजु वेगरे, निलेश कुलथे, भिमराज गांगुर्डे, मोहन मिसाळ, प्रशांत काकडे यांच्या पथकाने केली आहे.