♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Cyber Crime: बारा मोबाईलसह सुमारे चार लाखांचा मुद्देमाल नागरिकांना मिळाला परत; नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या सायबर क्राईम पथकाची कामगिरी 

Cyber Crime: बारा मोबाईलसह सुमारे चार लाखांचा मुद्देमाल नागरिकांना मिळाला परत; नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या सायबर क्राईम पथकाची कामगिरी 

 

पुणे: नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या सायबर क्राईम पथकाने हरवलेले किंवा चोरी गेलेले बारा महागडे मोबाईल ऑनलाईन फसवणुकीने लुबाडलेली 92 हजार रुपये रक्कम असा एकूण सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल संबंधित नागरिकांना परत मिळवून दिला आहे. सायबर क्राईम पथकाच्या या कामगिरीमुळे संबंधित नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलेले दिसून आले.

चोरीला गेलेले मोबाईल व ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेऊन सायबर क्राईम पथक सखोल तांत्रिक विश्लेषण करून तपास करत होते. हरवलेले मोबाईल सर्व्हिलान्सला लावण्यात आले होते. ज्या खात्यांमधून ऑनलाईन फसवणूक करुन पैसे चोरण्यात आले होते त्या संबंधित बॅंकांशी पोलीस पथकाने संपर्क साधून रक्कम गोठविली होती. तपासावर सातत्याने लक्ष केंद्रित करून तब्बल 12 महागडे मोबाईल व 92 हजार रुपये रक्कम असा एकूण सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल रिकव्हर करुन तो संबंधित तक्रारदार नागरिकांना परत देण्यात आला आहे.

पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, झोन तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गुरुदत्त मोरे, पोलीस उपनिरीक्षक गजानन पोतदार, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय जाधव, रोषण मंडले यांनी ही कामगिरी केली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles